पोलीस परेड मैदान येथे रेझिंग डे च्या कार्यक्रमाचा मोठया उत्साहाने समारोप…!
लाल दिवा-नाशिक,ता.८ : मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली व सर्व पोलीस उपायुक्त यांचे देखरेखीमध्ये दि.०२/०१/२०२४ रोजी ते दिनांक ०८/०१/२०२४ रोजी रोजी पावेतो २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलीस दलाचे स्थापना दिनानिमीत्त पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे हददीत रेझींग डे सप्ताह आयोजीत करून सर्व पोलीस ठाणे हद्दीत जनजागृतीपर तसेच विविध शाळा/महाविदयालयातील विदयार्थ्यांना पोलीस दलाची माहिती होणेकरीत पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
दिनांक ०८/०१/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वाजता रेझिंग डे च्या समारोप कार्यक्रमावेळी पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, नाशिक शहर येथे सिरेमोनियल परेडचे व शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सेरोमोनिअल परेड संचालनामध्ये क्यु. आर.टी., जलद प्रतिसाद पथक, दामिनी पथक, बी.डी.डी.एस., पोलीस मुख्यालय तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील नवप्रविष्ठ पोलीस अधिकारी व श्वान पथक यांनी सहभाग नोंदवुन परेडला शोभा आणली. परेड संचालानादरम्यान मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी मानवंदना स्विकारून परेड संचालन करण्यात आले.
रेझिंग डे निमीत्त आयोजीत केलेल्या सिरेमोनियल परेड संचलन कार्यक्रमासाठी नाशिक शहरातील विविध शाळा/महाविदयालयातील २००० ते २५०० हजार विदयार्थी हजर राहुन कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच परेड मैदान येथे नाशिक शहर पोलीस दलातर्फे १) पोलीस खात्यातील विविध शस्त्रे २) पोलीस इतिहास ३) सायबर पोलीसींग ४) ट्रॅफिक पोलीसींग ५) बी.डी.डी. एस. ६) दामिनी पथक ७) पोलीस दलातील वाहने असे विविध स्टॉल लावण्यात आले होते. शालेय विदयार्थी यांनी कुतुहलतेने उभारण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉल, शस्त्रे व वाहनांची माहिती विचारून पोलीस दलाची माहिती जाणुन घेतली.