रक्तरंजित त्र्यंबकनाका: किरकोळ वादातून पेव्हर ब्लॉकने हल्ला, फिरस्त्याची प्रकृती चिंताजनक….!

लाल दिवा-सीबीएस-त्र्यंबकनाका स्माटेरोडवर रविवारी दुपारी क्रूर घटनेने परिसर हादरला. किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाने ४० वर्षीय फिरस्त्यावर पेव्हर ब्लॉकने जीवघेणा हल्ला केला. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या जखमीला तातडीने शीसकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

 

एचआरडी सेंटरजवळ दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा थरार घडला. शिवीगाळीवरून सुरु झालेला वाद हाणामारीत पर्यवसला. रागातून अल्पवयीन मुलाने जवळच पडलेला पेव्हर ब्लॉक उचलून तो फिरस्त्याच्या डोक्यात अनेकवेळा आपटला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला फिरस्ता बेशुद्ध पडताच हल्लेखोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.

 

मात्र, सुदैवाने घटनास्थळी उपस्थित रिक्षाचालकांनी धाडस दाखवत त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसरीकडे, दुसऱ्या रिक्षाचालकांनी तातडीने पोलिस आणि रुग्णवाहिकेला कळविले. घटनास्थळी पोहोचलेल्या सरकारवाडा पोलिसांनी जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

 

सरकार वाडा पोलीस ह्या प्रकरणाचा तपास करत असून, अल्पवयीन हल्लेखोराविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!