जनहितार्थ प्रसारित ! रिटर्न दाखल करण्यास ३१ डिसेंबर असेल अखेरची मुदत… .; आर्थिक वर्ष २०२२-२३ चे रिटर्न अद्याप दाखल केले नसेल तर ३१ डिसेंबर पूर्वीच करावे लागणार हे काम : – कर सल्लागार योगेश भास्कर कातकाडे….!
लाल दिवा-नाशिक,ता.२५: आर्थिक वर्ष २०२२-२३ चे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची मुदत ही ३१ जुलै होती परंतु ज्या करदात्यांना मुदतीत रिटर्न भरता आलेले नाही ते मुदती नंतरही उशिरा रिटर्न दाखल करू शकणार आहेत.
इन्कम टॅक्स ॲक्टच्या कलम १३९ (४) व १३९ (५) तरतुदी नुसार करदात्यांना उशिरा त्याचबरोबर आधीच्या भरलेल्या रिटर्न मध्ये काही दुरुस्ती/बदल असल्यास पुन्हा रिटर्न दाखल करता येणार आहे.
ज्या करदात्यांचे ढोबळ उत्पन्न
– २.५ लाखापेक्षा कमी आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही परंतु ज्या करदात्यांचे ढोबळ उत्पन्न
– २.५ लाखापेक्षा जास्त व ५ लाखापर्यंत आहे त्यांना ₹ १०००/- तर ज्या करदात्यांचे ढोबळ उत्पन्न
– ५ लाखाहून जास्त आहे त्यांना ₹ ५०००/- इतका दंड भरावा लागणार आहे.
करदात्यांना रिटर्न दाखल करतेवेळी उपलब्ध असलेल्या सर्व वजावटी/सूट घेतल्या नंतर जर काही टॅक्स लागणार असेल तर तो देखील भरावा लागणार आहे.
श”आयकर विवरणपत्र हे निर्धारित वेळेतच भरले पाहिजे तुमच्या उत्पन्नाच्या सर्व स्रोता बद्दलची अचूक माहिती रिटर्न मध्ये सादर केली पाहिजे जेणेकरून भविष्यात तुम्हाला आयकर विभागाकडून कुठल्याही प्रकारच्या नोटिसांना सामोरे जावे लागणार नाही. काही कारणास्तव तुम्ही रिटर्न दाखल करू शकला नसला तर लेट फी भरून किंवा न भरता देखील ३१ डिसेंबर च्या आत रिटर्न दाखल करता येणार आहे. आय टी रिटर्न हे तुमच्या उत्पन्नाचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज असून ते विविध कामकाजाकरिता उपयोगी पडत असते त्यामुळे ते नियमित दाखल केल्याने फायदाच होणार आहे.” याकरिता कर सल्लागारांशी त्वरित संपर्क करावा.
योगेश भास्कर कातकाडे
कर सल्लागार
मो. ९८८१८४३६१७