“द केरला स्टोरी” चित्रपट करमुक्त करावा या मागणीला नाशिक येथील महिलांचा पुढाकार ….. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने हा चित्रपट पाहावा सकल हिंदू समाजाकडून महिलाना आवाहन ….!

लाल दिवा, ता. ३ : भारतात लव जिहाद या दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदू मुलींचे चित्रण करणाऱ्या द केरला स्टोरी हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा. ज्यामुळे “द केरला स्टोरी” या सिनेमा मधील हिंदू समाजावरील मुलींवर जिहादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी अनन्वित अत्याचार करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करून आयुष्यातून कशा पद्धतीने उध्वस्त केलें जाते, याचे योग्य आणि खरे चित्रीकरण प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला पाहता येईल. “द केरला स्टोरी” हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पाहता यावा. याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर करमुक्त करावा अशी विनंती नाशिक येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. 

 

      गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यात लव्ह जिहाद चे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन मोर्चे निघू लागले आहेत. तसेच लव जिहाद घटनांना कधीतरी मोठ्या प्रमाणात वाचा फोडण्यात येत असून हिंदू समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर दिसू लागला आहे.

या विषयावर बोलतांना सुद्धा नेतेमंडळी कधी काळी घाबरत होते. विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करतांना पोलीस अधिकारी देखील याकडे नेहमीच दुर्लक्ष करतांना दिसून येत होते. त्यामुळे लव्ह जिहाद चे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतांना दिसत होते. तसेच राज्यात लव्ह जिहाद कायदा व्हावा यासाठी मागणी होत असून विधिमंडळ अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडण्यात आला होता, पीडित हिंदू मुली आता समोर येऊ लागल्या असून आपबीतीचे कथन करू लागले आहेत. आपल्या सरकारच्या काळात तरी आता आम्हाला न्याय मिळेल अशी आशा त्यांना वाटू लागली आहे. राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लव्ह जिहाद ला आळा बसेल आणि पीडित हिंदू मुलींना न्याय मिळेल अशी अपेक्षा आता प्रत्येकजण करू लागले आहेत. “द केरला स्टोरी” या हिंदी चित्रपटामुळे तर याचे वास्तव आता खऱ्या अर्थाने उजेडात आले आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त हिंदू बांधवांपर्यंत पोहोचवा. यासाठी नाशिक सकल हिंदू समाजाच्या वतीने खास करून महिला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असताना दिसत आहे. सदर चित्रपट प्रत्येकाने पहावा हा उद्दात हेतू लक्षात घेऊन राज्य सरकारने या चित्रपटाला करमुक्त करावा, अशी माफक अपेक्षा सर्व हिंदू समाज बांधवांमधून व्यक्त होताना दिसत असून आपल्या नेतृत्व व कर्तृत्वामुळे हा चित्रपट नक्कीच करमुक्त होईल. जास्तीत जास्त हिंदू बांधव बघतील अशी अपेक्षा या माध्यमातून सकल हिंदू समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात येत असून नक्कीच आपण या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तो तुम्ही हा प्रश्र्न मार्गी लावाल अशी अपेक्षा यावेळी युवती मोठ्या संख्येने व्यक्त करताना दिसून येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!