जिल्हा सत्र न्यायालय यांनी खुनाच्या गुन्हयात सहा वर्षापुर्वी फरार घोषीत केलेला आरोपी जेरबंद ….. गुन्हेशाखा युनिट क्र. १ ची दमदार कामगिरी …!
लाल दिवा : पोलीस आयुक्त व उप आयुक्त (गुन्हे) शहरातील फरार आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई बाबतच्या सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट ०१ कडुन फरार आरोपीतांचा शोध चालु होता.
पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर कडील गुन्हा रजि. नंबर १८८/२००९ भा. द. वि. कलम ३०२, ३४ या गुन्हयातील आरोपी निलेश विनायक कोळेकर याचे विरूध्द सन २०१७ मध्ये मा. जिल्हा सत्र न्यायालय, | नाशिक यांनी खुनाच्या गुन्हयात जाहीरनामा प्रसिध्द करून तो मुदतीत मा. न्यायालया समक्ष हजर न झाल्याने | त्यास फरार घोषीत केले होते. त्या अनुषंगाने सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर ३४३ / २०१७ भा. द.
वि. कलम १७४ (अ) प्रमाणे दि. २०/०७/२०१७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
आज दि. २७/०५/२०२३ रोजी गुन्हेशाखा युनिट ०१ चे पोलीस पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त फिरत | असतांना वरील नमुद गुन्हयांमधील मा. न्यायालयाने फरार घोषीत केलेला आरोपी निलेश विनायक कोळेकर यास | मोठ्या शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांने गुन्हयाची कबुली दिली आहे. सदर आरोपीतास पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. असुन पुढील तपास सरकारवाडा पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, मा. पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव सो, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. वसंत मोरे सो, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर | कडील वपोनि. श्री. विजय ढमाळ, सपोउनि / रविंद्र बागुल, पो. हवा. / नाझीम पठाण, पो.ना. / विशाल देवरे, विशाल काठे, आप्पा पानवळ, संजय राठोड, पो. हवा./ सुरेश माळोदे, शरद सोनवणे यांनी केलेली आहे.