पायी येऊन महीलेची चैनस्नॅचिंग करणारा गुन्हेगार जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची कामगीरी…!
लाल दिवा-नाशिक,१३: शहरातील चैनस्नॅचिंग उघडकीस आणण्याकामी मा. पोलीस आयुक्त सो., मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे यांनी सुचना व मार्गदर्शन केले होते.
त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस अधिकारी व अंमलदार भद्रकाली पो.स्टे. गुरनं- ३४९/२०२३भादविक ३९२ या गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना, दिनांक ११/११/२०२३ रोजी पो. हवा/१०९ प्रविण वाघमारे यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की, रस्त्याने पायी जाणा-या महीलेची सोनसाखळी जबरी चोरी करणारा संशयीत गुन्हेगार हा गंगाघाट पंचवटी नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती, सदरची माहीती वपोनिरी. श्री. विजय ढमाळ सो. यांना कळविली असता, वपोनिरी. श्री. विजय ढमाळ सो. यांनी पो. हवा प्रविण वाघमारे, पो. हवा विशाल काठे, पोहवा/३६७ प्रदीप म्हसदे, पोहवा देवीदास ठाकरे, पोहवा संदीप भांड, पोहवा नाझीमखान पठाण, पोना विशाल देवरे, पोना प्रशांत मरकड व पोअं. मुक्तार शेख अशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीवरून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने वरील नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर इमसाचा गंगाघाट पंचवटी नाशिक येथे शोध घेवुन त्यास पकडुन ताब्यात घेतले. त्यास त्यांचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नावे मुकेश राजु भालेराव वय २४ वर्षे रा. समतानगर, टाकळी, ओझन बिल्डींगजवळ, नाशिक मुळ रा. लासगांव. ता.पाचोरा जि. जळगांव असे सांगुन त्याचे कडे वरील गुन्हया संबधी विचारपुस करता त्याने गुन्हयाची कबुली देवुन त्याचेकडुन ८ ग्रॅम सोने, ४८,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, सदर आरोपीकडुन चैनस्नेचिंगचा गुन्हा उघडकीस आला असुन आरोपीतास पुढील कारवाई कामी भद्रकाली पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे
सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. अंकुश शिंदे साो. मा. पोलीस उप आयुक्त साो. गुन्हे, प्रशांत बच्छाव साो. मा. सहा. पोलीस आयुक्त साो. डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / चेतन श्रीवंत, पोलीस अंमलदार प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, देवीदास ठाकरे, संदीप भांड, नाझीमखान पठाण, विशाल देवरे, प्रशांत मरकड मुक्तार शेख व जगेश्वर बोरसे अशांनी केली आहे.