गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या सिमेंट बास्केटबॉल ग्राउंड चे अवघे दहा दिवसात पोलीस आयुक्तांच्या हस्ते भूमिपूजन…..पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाल्यांमध्ये आनंदाचे वातावरण….!
लाल दिवा : पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथे दहा वर्षापासून रखडलेल्या बास्केटबॉल चे सिमेंट कोर्ट मैदान तारेचे कंपाउंड सह याचे आज रोजी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
याप्रसंगी चंद्रकांत खांडवी पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर, देशमुख सिताराम कोल्हे ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड , मनोहर करंडे, रणजीत नलावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशपाक शेख क्रीडा प्रमुख , कॉन्ट्रॅक्टर सुधीर घुले पोलिसांचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग प्रेम गुरुग भोसले सर कार्लोस थॉमस बाळकृष्ण देशपांडे हे उपस्थित दहा वर्षापासून रखडलेल्या सिमेंट कोण बास्केटबॉल मैदानाच्या कामास नव नियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यामुळे पोलीस अधिकारी कर्मचारी व पोलीस पाल्य यांच्याकरिता नवीन सिमेंट कोर्ट बास्केटबॉल मैदान तयार करण्याचे मूर्त लाभले पोलीस अधिकारी कर्मचारी व पोलीस पाल्य यांनी साहेबांना बास्केटबॉल मैदान तयार करण्याची विनंती केल्यानंतर अवघे दहा दिवसात नवीन सिमेंट कोर्ट सिंथेटिक बास्केटबॉल मैदान तयार करण्यास आज शुभारंभ झाला. सदर बास्केटबॉल च्या सिमेंट कोर्ट बास्केटबॉल च्या कामाकरिता पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर करंडे चुंचाळे पोलीस स्टेशन यांनी आघाडी घेऊन युद्धपातळीवर काम चालू केले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार सांभाळण्यापासून पोलीस खेळाडूंसाठी अत्याधुनिक ऑलम्पिक वेटलिफ्टिंगचे साहित्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टिक खेळाडूंना शूज गोलकीपर कीट, सर्व कबड्डी वेटलिफ्टिंग रनिंग याकरता लागणारे उच्च दर्जाचे शूज, कुस्ती कस्टम, अथलेटिक्स स्पाईक पाणी सर्व खेळांचे नवीन साहित्याची मागणी करून खेळाडूंना पुरवल्याबद्दल खेळाडूंनी पोलीस आयुक्त साहेबांचे आभार मानले आहे.