अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या करुन मोखाडा परिसरात नेऊन त्यास जाळून टाकणारा आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद करुन गुन्हा उघडकिस ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्रं. १ ची धडाकेबाज कामगिरी…!

लाल दिवा-नाशिक,ता.११:- पंचवटी पोलीस ठाणे कडील । गुरनं ७८/२०२४ भादवि कलम ३६४, १२० ब, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे दि. १०/०२/२०२४ रोजी दाखल झाला होता. सदर गुन्हयातील आरोपी हे फिर्यादी प्रितेश रमेश काजळे यांचा चुलत भाउ संदेश काजळे यास बळजबरीने कोठेतरी घेवून फरार झाले होते.

 

सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस आयुक्त सो. संदीप कर्णीक साो. यांनी सुचना दिल्या होत्या, तसेच मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री बच्छाव साो. व मा. सपोआ डॉ. सिताराम कोल्हे सो. यांनी गुन्हेशाखा युनिट कमांक १ यांना मार्गदर्शन केले होते.

त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क. १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेत असतांना पोना /१९०० विशाल देवरे यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली की, गुन्हयातील पाहिजे आरोपी स्वप्निल उनव्हणे हा एका सिल्व्हर रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या इको वाहनामध्ये त्रंबकेश्वर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळविली. सदरची माहिती वपोनिरी/अनिल शिंदे यांना दिली त्यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करुन संशयीत इसमास ताब्यात घेणे कामी गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील सपोनि हेमंत तोडकर सपोउनि / रविंद्र बागुल, पोहवा /१०९ प्रविण वाघमारे, पोहवा /१८८३ विशाल काठे, पोना/१९०० विशाल देवरे, पोअं/१४०५ आप्पा पानवळ, चापोअं/८५ समाधान पवार अशांचे पथक पाठविले असता, नमुद पथकाने सदर ठिकाणी जावुन मिळालेल्या बातमी प्रमाणे त्रंबकेश्वर परिसरात सापळा लावुन इको गाडी व इसम नामे स्वप्नील दिनेश उनव्हणे, वय-२३वर्षे, रा-ओमसाई निवास, निमाणी बसस्टॉप समोर, राजवाडा पंचवटी नाशिक यास ताब्यात घेवुन त्यास वरील गुन्हयाचे बाबत विचारपुस केली असता त्याने त्याने व त्याचे साथीदार १) रणजित आहेर, रा-राजवाडा पंचवटी नाशिक, २) नितीन उर्फ पप्पु चौघुले, रा-ड्रिम कॅस्टलच्या पाठीमागे, पंचवटी नाशिक, ३) पवन भालेराव, रा-त्रंबकेश्वर राजवाडा जि. नाशिक अशांनी मिळून संदेश चंद्रकांत काजळे यास दिनांक १०/०२/२०२४ रोजी रात्री १२/३० वाजेच्या सुमारास बळजबरीने याच गाडीत बसवुन त्यास रणजित आहेर व नितीन चौघुले यांनी कोयता व लोखंडे रॉडने मारहाण करून जखमी करून त्यास जिवे ठार मारून मोखाडा परिसरात नेवुन त्यास जाळुन टाकले आहे अशी हकीगत सांगुन गुन्हयाची कबुली दिल्यावरून त्याचे कब्ज्यातुन ४,००,०००/-रूपये किंमतीची एक सिल्व्हर रंगाची मारूती सुझुकी कंपनीची इको विना नंबर प्लेट असलेली चारचाकी ही सविस्तर पंचनामा करून जप्त करण्यात आली असुन आरोपीने दिलेल्या कबुलीवरून पंचवटी पोलीस ठाणे कडील । गुरनं ७८/२०२४ भादवि कलम ३६४, १२० ब, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे हा गुन्हा उघडकीस आला आहे.

सदर कामगिरी मा. पोलीस आयुक्त साो, श्री. संदिप कर्णिक साो. मा. पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे, प्रशांत बच्छाव साो., मा. सहा. पोलीस आयुक्त साो. डॉ. सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अनिल शिंदे, सपोनि हेमंत तोडकर, सपोउनि  रविंद्र बागुल, पोहवा प्रविण वाघमारे, विशाल काठे, पोना  विशाल देवरे, पोअं आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, चापोअं समाधान पवार अशांनी केली आहे..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!