ठाकरे गटाचे महानगर प्रमुख मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता सोबत ; आ. नितेश राणेंच्या दाव्याने एकच खळबळ…!

लाल दिवा : ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे मुंबई ब्लास्ट प्रकरणातील सलीम कुत्ता या आरोपी सोबत एका पार्टीत असल्याचा फोटो भाजपा आमदार नीतेश राणे यांनी झळकवत एकच खळबळ उडवली आहे. तर श्री बडगुजर यांनी वर्षभरापूर्वी नारायण राणे यांच्यावर नाशिकमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याची नितेश राणे यांनी एक प्रकारे बदला घेतल्याचे बोलले जात आहे…

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी अशी देखील मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे. सदर प्रकरणामुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली असून ठाकरे गटात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता यासंदर्भात सुधाकर बडगुजर नेमकी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई बॉम्बस्फोटात शिक्षा झालेल्या सलीम शेख सोबत उबाठाचे सुधाकर बडगुजर नाचत असल्याचा व्हिडीओ धक्कादायक आहे. सुधाकर बडगुजर यांना नाशिक मध्ये काही भयानक घडवायचे आहे का ? याची चौकशी झालीच पाहिजे. बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराशी बंधुत्व, हेच आहे का उबाठाचे हिंदुत्व ? असा सवाल शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी केला आहे.

१२ मार्च १९९३ ला मुंबईत १२ ब्लास्ट झाले होते. संपुर्ण देशाला हादरुन देणारा हा दिवस होता. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट म्हणावा लागेल. या हल्लात २५७ जणांचा मृत्यू झाला होता तर ७०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही अंगावर काटा आणतात. या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा खास शूटर सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याला ही कटात सहभागी असल्याने न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. या सलीम शेख सोबत उबाठा गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे ‘मैं हूं डॉन’ या गाण्यावर डान्स करतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे…

संजय राऊतची पिपाणी, देशद्रोह्यांसोबत गातो गाणी. मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून दहशत माजविणाऱ्या देशद्रोह्याचे पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देतांनाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. बडगुजर यांची तातडीने चौकशी व्हावी, त्यांनी काय भेट दिले? नाशिक मध्ये काही मोठे घडवायचे नियोजन आहे का?..

……………….

याची चौकशी झालीच पाहिजे. २५७ निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्यांचे, शिवसेना भवन उडविण्याचा कट रचणाऱ्याचे स्वागत सुधाकर बडगुजर का करत होते? त्याच्या सोबत नाचतात. हेच यांचे बेगडी हिंदुत्व आहे का? बडगुजर यांना नाशिकचे डॉन व्हायचे आहे का? ही पार्टी कुठे झाली? नाशिककरांना या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेना महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांनी केली आहे…….

प्रतिक्रीया : प्रदीप पेशकार, भाजपा नेते

 

नाशिकरांनो व्हा सावधान

आज विधानसभेमध्ये माननीय आमदार नितेशजी राणे आणि नाशिकचे पालकमंत्री महोदय मा. दादाजी भुसे यांनी अतिशय गंभीर बाब नाशिकच्या एका तथाकथित हिंदुत्ववादी राजकीय पक्षाच्या संशयास्पद नेत्याबद्दल उघडकीस आणली.

मुंबई येथील बाॅम्ब स्फोटाचा मुख्य …

आरोपी दहशतवादी दाऊद च्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर पॅरोल वर असताना पार्टी करणे सलगी ठेवणे आणि डान्स करणे हे या महाशयाने केले आहे. आजपर्यंत नाशिककर या अतिरेक्यांच्या एजंटांना पोसत होते काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. आज जे उघडकीस आले आहे ते अत्यंत भयावह असे चित्र एका हिंदुत्ववादी पक्षाचे सोंग घेतलेल्या व सलीम कुत्ता च्या साथीदाराच्या मुस्क्या वेळेवरच आवळायला हव्यात. नाशिककरांना पर्यायाने महाराष्ट्रालाच यापासून वाचवायला हवं. माननीय गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आपले आभार की आपण यामध्ये एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश दिले, त्याचप्रमाणे नितेश राणे जी आणि पालकमंत्री दादासाहेब भुसेजी यांचेही आभार यांनी ही बाब निदर्शनास आणून पुढील होणारा अनर्थ टाळला आहे.

 

प्रदीप पेशकार

प्रदेश प्रवक्ता,

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र….

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!