नाशिकरोडमध्ये तरुणीला प्रेमाच्या नावाखाली त्रास, घरासमोर तोडफोड !

नाशिकरोडमध्ये एकतर्फी प्रेमाचा अत्याचार, तरुणी घाबरली

लाल दिवा-नाशिकरोड,दि.१३:- प्रेमसंबंधात एकतर्फी प्रेमाचे वेड तरुणांच्या डोक्यातून कसे भरेल हे सांगता येत नाही. याचेच भीषण उदाहरण नाशिकरोडमध्ये घडले आहे. एका तरुणीने प्रेमाच्या नावाखाली त्रास देणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भुषण खांडेकर असे आरोपी तरुणाचे नाव असून तो लोखंडे मळा, नाशिकरोड येथील रहिवासी आहे. 

पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून भुषण तिचा पाठलाग करीत होता. “माझे तुझ्यावर प्रेम आहे”, “तू मला खूप आवडतेस”, “तू माझ्याशी बोलत जा” अशा शब्दांत तो तिच्याशी गैरवापर करीत होता. तो तिचा हॉस्पिटल आणि घरापर्यंत पाठलाग करीत असे.

याबाबत तरुणीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता दि. ३१ ऑगस्ट रोजी तो त्याचा मित्र योगेश (पूर्ण नाव पत्ता अज्ञात) यासह तिच्या घरासमोर आला. दोघांनी आरडाओरड करून शिवीगाळ सुरू केली. भुषणने “तू बाहेर ये, तू बाहेर आली नाहीस तर तुझे घर पेटवून देईल” अशी धमकी देत घराची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तरुणीने घराबाहेर पडण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या भुषणने तिथेच उभी असलेल्या तिच्या कारची काच फोडली. 

या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भुषण खांडेकर आणि त्याचा मित्र योगेश यांच्या विरुद्ध भा.न्या.सं.क ७८, ३५२, ३५१(२), ३२४(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

नाशिकरोड पोलीस स्टेशनचे सपोनि काळे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री ११:२६ वा. ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अद्याप कुणाचीही अटक करण्यात आलेली नाही. वपोनि अशोक गिरी यांनी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली. वपोनि गिरी आणि सपोनि सुर्यवंशी यांनी रात्री ११:५५ वा. घटनास्थळी भेट दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!