तलाठी पेपर कॉपी प्रकरण: फरार आरोपीला वर्षांनंतर अटक

लाल दिवा-नाशिक,दि.३१:-म्हसरूळ तलाठी भरती परीक्षेत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सहाय्याने कॉपी करण्याच्या प्रकरणात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असलेला कैलास रामसिंग बहुरे (वय २६, रा. मु. जोडवाडी, पो. कचनेर, जि. औरंगाबाद) याला नौपाडा येथून अटक करण्यात आली.

गणेश गुसिंगे आणि इतर आरोपींसह कैलास बहुरे यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या तलाठी भरती परीक्षेत इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर कैलास बहुरे हा फरार होता. म्हसरूळ पोलीस ठाण्यातील गुन्हा नं. १७०/२०२३ अन्वये भादंवि कलम ४२०, ५११, १२० ब, २०१ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

म्हसरूळ पोलिसांनी नौपाडा येथून कैलासला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!