तलाठी आसिफ अनिस पठाण यांचा सापळ्यात ‘क्लीन बोल्ड’! सातबारा उताऱ्यासाठी लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक!
‘लाच’ नावाचा ‘खेळ’ खेळणे तलाठीला पडले महागात!
नाशिक: सातबारा उताऱ्यावर नाव चढवण्यासाठी तब्बल तीन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या ‘लाचखोर’ तलाठीला एसीबीने २ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही घटना २८ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली. जिल्ह्यातील लाचखोरांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
जळगाव येथे कार्यरत असलेले आसिफ अनिस पठाण (वय ५२) असे या ‘‘ तलाठीचे नाव आहे. नुकताच जळगाव येथील एका व्यापाऱ्याने एक व्यापारी गाळा खरेदी केला. या गाळ्याच्या कागदपत्रांवर नाव लावण्यासाठी आणि सातबारा उताऱ्यावर नाव चढविण्यासाठी पठाण यांनी त्याच्याकडून तीन हजार रुपयांची लाच मागितली. ‘तडजोडी’अंती ही रक्कम २ हजार रुपये करण्यात आली. पण लाच देण्यास नकार देत, व्यापाऱ्याने थेट एसीबीची मदत घेतली.
एसीबीनेही या लाचखोराला चोख प्रत्युत्तर देण्याचे ठरवले. त्यांनी सापळा रचून ठरलेल्या वेळी आणि ठिकारी व्यापाऱ्यामार्फत पठाण याला २ हजार रुपये देताच एसीबी अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले.
पोलीस निरीक्षक मीरा वसंतराव आदमाने यांच्या नेतृत्वाखालील एसीबीच्या पथकाने ही कामगिरी केली. या धडाकेबाज कारवाईत पोलीस हवालदार पंकज पळशीकर, प्रमोद चव्हाणके आणि चालक संतोष गांगुर्डे यांचाही समावेश होता.
पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु असून निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबीने या धडाकेबाज कारवाईद्वारे लाचखोरांना इशारा दिला असून, नागरिकांना भीती न बाळगता अशा लाचखोरांची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.