तडीपारेचा आदेशाचा भंग करत पोलिसांना बगल देत नाशिकरोड मध्ये वास्तव्य करणाऱ्या … इसमास पोलिसांनी उपनगर हद्दीत ठोकल्या बेड्या.. गुन्हे शाखा युनिट -2 ची कामगिरी…..

लाल दिवा-नाशिक,ता.६ :- दि.५ जानेवारी २४ रोजी गुन्हे शाखा कडील नेमणुकीचे पो.हवा. गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की नाशिक शहर व नाशिक जिल्ह्यातून तडीपार केलेला इसम नामे अभिजीत शिराळ हा मारुती मंदिराजवळ विहितगाव उपनगर नाशिक रोड येथे आल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतले.

त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अभिजीत विलास शिराळ वय २४ राहणार विहीतगांव नाशिक रोड नाशिक असे सांगितले. त्यास पुढील कार्यवाहीकामी उपनगर पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आले आहे सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम सपकाळ, पोलीस हवालदार गुलाब सोनार , प्रकाश भालेराव, चंद्रकांत गवळी, सुनील आहेर यांनी केली आहे…..

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!