खुनाच्या गुन्हयातील संशयीत आरोपीस ४ तासात गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने घेतले ताब्यात !
लाल दिवा, ता. ३० : नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाणे हददीत दि. २९/०४/२०२३ रोजी मयत गुलाम रब्बानी मोहंमद यास विजय पाटील, यश पवार व त्यांचे दोन साथीदार यांनी मारहान करून त्यास चॉपरने पाठीमागुन वार करून जिवे ठार |मारले यावरून आडगाव पोलीस ठाणे गुरनं १३१ / २०२३ भादवि कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर आरोपीतांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई बाबतच्या सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट ०१ कडुन गुन्हयाचा समांतर तपास चालु होता.
सदर गुन्हया मध्ये कोणताही पुरावा नसतांना गुन्हेशाखा युनिट ०१ च्या अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हे तपासाचे मानवी कौशल्य वापरून तसेच घटनास्थळावरील सिसिटीव्ही फुटेज प्राप्त करून लागलीच आरोपीतांचे | नावे निष्पन्न केली सदर आरोपीतांचा शोध घेवुन आरोपी नामे १) यश कैलास पवार वय – १८ धदा पाण्याचे जार रा. संत कबीर नगर, म्हसोबा जवळ, व्दारका, नाशिक २) प्रसाद रामनाथ पवार वय २४ धदा – सर्व्हिस सेंटर रा. शिवनगर, पवार महा औ. बाद रोड, नाशिक व ०१ अल्पवयीन बालक यांना मोठ्या शिताफीने पकडुन त्यांना | ताब्यात घेवुन गुन्हयाचे अनुषंगाने नमुद आरोपीतांना विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. | सदर आरोपीतांना पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. असुन पुढील तपास आडगाव पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो, मा. पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव सो, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. वसंत मोरे सो, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वपोनि. श्री. विजय ढमाळ, सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि / चेतन श्रीवंत, सपोउनि / किरण शिरसाठ पो. हवा. प्रविण वाघमारे, सुरेश माळोदे, शरद सोनवणे, रामदास भडांगे, संदिप भांड, धनंजय शिंदे, पो.ना./ विशाल देवरे, विशाल काठे, योगीराज गायकवाड, मोतीराम चव्हाण प्रशांत मरकड, मुक्तार शेख, गुजांळ, गौरव खांडरे, पानवळ, यांनी केलेली आहे.