माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही : सुधाकर बडगुजर ..!
लाल दिवा-नाशिक,ता.१५ : यासंदर्भात श्री. बडगुजर यांनी श्री. भुसे यांना उत्तर देत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, माझा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. उलट ड्रग्जसारख्या गंभीर व समाजाला उध्वस्त करणाऱ्या, युवा पिढीचे भवितव्य नष्ट करणाऱ्या आरोपींशी त्यांचे काय संबंध आहे? अशी चर्चा आहे. या ड्रग्स प्रकरणात पालकमंत्री दादा भुसे यांच्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालं पाहिजे.
ते म्हणाले, आरोप करणाऱ्यांनी केले. त्यात काहीही तथ्य नाही. पालकमंत्री भुसे यांनी थोडासा अभ्यास करायलाहवा होता. मी अटकपूर्व जामीन वगैरे काहीही घेणार नाही. कारण मी काहीच केलेले नाही, त्यामुळे मला भीती नाही. मात्र दादा भुसे यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. राजकारणात येण्यापूर्वी भुसे नोकरी करीत होते. त्या नोकरीतून त्यांना का निलंबित करण्यात आले? हे त्यांनी सांगावे. त्यावर विचार केला नाही तर त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं.भाजपच्या तत्कालीन महिला आघाडीच्या राष्ट्रीय अद्यक्षा विजया रहाटकर यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले होते. शिवसेना अखंड महाराष्ट्राचे समर्थन करते. त्यामुळे आमचा रहाटकर यांच्या भूमिकेला विरोध होता. त्यांची नाशिकमधील सभा आम्ही उधळली. तेव्हा २०१६ मध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. मी १५ दिवस कारागृहात होतो. तीथे बॉम्बस्फोटातील आरोपी देखील होते. त्याची आम्हाला काहीही कल्पना नव्हती. माझ्यावर जी केस झाली ती राजकीय होती. त्यामुळे सलीम कुत्ता कोण? काय करतो?. कुठे राहतो?. आम्हाला काहीही कल्पना नाही. त्यामुळे त्याच्याशी संबंधांचा काहीच विषय येत नाही…