उपनगर पोलीसांनी २ गावठी बनावटीचे कटट्रे व ३ जिवंत काडतुसासह तीन आरोपींना ठोकल्या बेडया…..!
लाल दिवा-नाशिक: मा. पोलीस आयुक्त साो श्री संदीप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, श्रीम. मोनिका राउत मॅडम, मा. सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ. श्री. सचिन बारी साो यांनी नाशिक शहरातील गुंड प्रवृत्तीच्या व दहशत पसवणा-या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत वारंवार सुचना देवून व मार्गदर्शन केले होते.
मा. वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे तसेच वपोनि श्री. जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. बाबासाहेब दुकळे यांनी स्वतः उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांच्यासोबत पोलीस ठाणे हदितील आरोपींचे घरी भेटी देवून तसेच उपनगर पोलीस ठाणे हदिील समतानगर झोपडपट्टी, टाकळी गाव, आम्रपाली झोपडपट्टी, रोकडोबावाडी, फर्नांडीस वाडी या भागात विशेष मोहिम राबवून उघडयावर दारू पिणारे, टवाळखोर यांच्या वर कारवाई करण्यास सुरूवात केली. त्यानुसार दिनांक २७/०१/२०२४ रोजी समतानगर परिसरातील आरोपींवर निबंध आणण्याचे व नागरिकांच्या मनात सुरक्षितता निर्माण करण्याचे दृष्टीने सायंकाळी पायी गस्त केली. पोलीस परिणाम कारकरित्या काम करत असल्याचे पाहून दिनांक २८/०१/२०२४ रात्रगस्ती करण्याबाबत उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोशि. २२९२/जयंत शिंदे यांना उपनगर पोलीस ठाण्याचे पोहवा ५८ गुंड यांनी इच्छामणी लॉन्स, जवळील मैदानाजवळ, नाशिक पुणे रोडवर एक इसम गावठी कट्टा व काडतूस घेवून येणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्याचे सांगितले. त्यानुसार सदर बातमीची माहिती वपोनि श्री. जितेंद्र सपकाळे यांना दिली असता त्यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि चौधरी, पोहवा ३३२/शेख, पोशि. २२९२/जयंत शिंदे, पोशि./२४४२ अनिल शिंदे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस पथकाने खालील नमुद दोन आरोपींना त्यांच्या ताब्यात १ गावठी कट्टा व १ जिवंत काडतुस सह ताब्यात घेतले. सदर आरोपींना ताब्यात घेवून सपोनि चौधरी, पोहवा लखन, पोशि सुरज गवळी, पोशि कर्पे, पोशि. राहुल जगताप, पोशि सौरभ लोंढे, संदेश रगतवान यांनी कौशल्याने विचारपुस करून त्यांच्याकडून माहिती मिळवून आरोपींचा अजून एका साथीदार अटक करून त्याच्याकडून ०१ गावठी कट्टा व २ जिवंत काडतूस हस्तगत केले आहेत.
- १. शुभम अशोक जाधव वय २३ वर्षे, , रा. सोनवणे बाबा चौक, समतानगर, उपनगर नाशिक 7
- २. सचिन धर्मा सोनवणे वय २४ वर्षे, , रा. सोनवणे बाबा चौक, समतानगर, उपनगर नाशिक ३. गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी वय २४ वर्षे, रा. सिध्दार्थ किराणा जवळ, समतानगर, नाशिक]।
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो श्री संदीप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, श्रीम. मोनिका राउत मॅडम, मा. सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ. श्री. सचिन बारी सो यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि / श्री. जितेंद सपकाळे, पो. निरी. बाबासो दुकळे, सपोनि चौधरी, पोहवा लखन, पोहवा इमरान शेख, पोशि. जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुरज गवळी, पंकज कर्पे, राहुल जगताप, सौरभ लोंढे, संदेश रगतवान यांनी केली असुन नमुद गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोहवा ३३२ इमरान शेख हे करीत आहेत.