उपनगर ! गावठी पिस्तुलासह दोघं ताब्यात ; अवैध शस्त्र बाळगणा-यांविरोधी विशेष मोहिम …वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिर…!

लाल दिवा-नाशिक,ता.१:-उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे( दि.१ )मे २४ रोजी महालक्ष्मी नगर, गोदावरी नदीच्या काठी, दसक गाव परीसरात गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल व काडतूस विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली असता उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोनि गुन्हे रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनानुसार सपोनि सचिन चौधरी, पोलीस हवालदार विनोंद लखन, शेख, पंकज कर्पे, सौरभ लोंढे असे पथकाने सापळा लावून गावठी पिस्तुल सोबत बाळणारे दोन इसमांना गावठी पिस्तूल व एक काडतूस सह ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी नामे

  • १) ऋतीक दत्तु लोहकरे वय २५ वर्षे, रा. इच्छामणी गणेश रो हाउस, नं १०, धनराज नगर, जुना सायखेडा रोड जेलरोड नाशिक

 

  • २) मयुर राजाराम हिरे वय २१ वर्षे, प्लॉट नं ९, महालक्ष्मी नगर, दसक गाव जेल रोड नाशिक रोड नाशिक यांना अटक केले असून त्यांच्याविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यास गुन्हा रजि क १६५/२०२४ कलम ३/२५, ५/२५ भारतीय हत्यार कायदा अन्यवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या विशेष मोहिम अंतर्गत पोलीस उप आयुक्त मोनिका राउत, सहा. पोलीस आयुक्त सचिन बारी, वपोनि. जितेंद्र सपकाळे, पोनि गुन्हे रणजित नलावडे यांचे मार्गदर्शना प्रमाणे सपोनि सचिन चौधरी, पोहवा विनोद लखन, इमरान शेख, पोशि पंकज कर्पे, पोशि सुरज गवळी, पोशि अनिल शिंदे, पोशि, जयंत शिंदे, पोशि गौरव गवळी, पोशि संदेश रगतवान, पोशि सुनिल गायकवाड, पोशि सौरभ लोंढे, यांनी कामगिरी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहवा शेख करत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!