पौष्टिक तृणधान्यांचा आहारात नियमित वापर करावा :- उपविभागीय अधिकारी जतिन रहमान…..!
लाल दिवा-नाशिक, दिनांक : 12 जानेवारी पांरपारिक आहाराला चालना देवुन सर्व सामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. सुदृढ व आरोग्यदायी समाजासाठी प्रत्येकाने पौष्टिक तृणधान्यांचा आहारात नियमित वापर करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नाशिकचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जतिन रहमान यांनी केले असल्याचे कृषी उपसंचालक यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष व 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत रामेती येथून पौष्टीक तृणधान्याचे आहारातील महत्व नागरिकांना अवगत करून त्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी मोटार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय कृषी सह संचालक मोहन वाघ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, आत्मा चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, कृषी उपसंचालक जगदीश पाटील, रामेती चे प्राचार्य शिवाजी आमले यांच्यासह सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
पौष्टिक तृणधान्य पिकांचा नागरिकांमध्ये प्रचार प्रसिद्धी करण्याच्या अनुषंगाने मिलेट प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पौष्टिक तृणधान्याचे मानवी आहारातील महत्व नागरिकाना माहिती व्हावे तसेच ज्वारी, नाचणी, बाजरी, वरई यांचे आहारातील प्रमाण वाढावे यासाठी कृषि विभागामार्फत शाळा, महाविद्यालय येथे मिलेट ऑफ द ईयर ही संकल्पना राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जनजागृती व प्रचार प्रसिद्धी करिता मोटरसायकल रॅली व ठिकठिकाणी पथनाट्य आयोजन महाविद्यालयीन विद्यार्थी व कृषि कर्मचारी यांचेमार्फत करण्यात आले होते. या मोटार रॅली व रोड शो मध्ये मिलेट या संकल्पनेवर आधारित साकारलेल्या मिलेट रथासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी संलग्न विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे के. के. वाघ व मराठा विद्या प्रसारक कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी व विविध वृतपत्रांचे प्रतिनिधी सहभागी झाल्याचेही शासकीय प्रसिद्धी पत्रकात कृषी उपसंचालक यांनी सांगितले आ