गोदावरीला पाणेवेली मुक्त ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी उभारलेली मोहीम कौतुकास्पद ; उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे ………! गोदावरील प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सरसावले व्ही.एन.नाईक महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी .!
लाल दिवा.नाशिक, दि.11 मे,2023 गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्या मुळे गवत पाला -पाचोळा, पाणजल वनस्पती याचा ढीग वाहत येऊन गोदावरीच्या काठावर मोठ्या प्रमाणात जमा झाल्या आहेत. काठावर जमा झालेला पालापाचोळा व पाणवेली यांची विल्हेवाट लावण्यासाठी व्ही.एन.नाईक महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी पुढे आले आहेत.
गोदावरीला पाणवेलीमुक्त ठेवण्यासाठी एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी उभारलेली मोहीम कौतुकास्पद आहे, असे उद्गार विभागीय माहिती उपसंचालक (माहिती) तथा गोदावरी प्रदूषण नियंत्रण प्रचार व प्रसिद्धी स्तरावरील उपसमितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर इगवे यांनी व्यक्त केले.
रामकुंडावर के. व्ही.एन.नाईक महाविद्यालयातील एनएसएस च्या विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ भारत अभियान – हाच गोदा सन्मान’ या मोहिमेअंतर्गत गोदावरी नदीत साचलेल्या पाणवेली काढून गोदावरी नदीचा सन्मान केला. यावेळी व्ही.एन.नाईक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. समीन शेख, डॉ. संध्या सोनकांबळे, गोकुळ, काकड, ऋषिकेश कोठुळे, आशिष यादव, ऐश्वर्या पालेकर, माया मोरे, कशिश जैन विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते.
गोदावरी पात्रातील पाणवेली काढण्याचे काम नाशिक महानगरपालिका करत आहे. गोदावरीचे पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांनी व भाविकांनी निर्माल्य किंवा इतर साहित्य नदीपात्रात टाकू नये. ‘स्वच्छ भारत अभियान – हाच गोदा सन्मान’ या मोहिमेत सर्वांनी सहभागी होवून गोदावरी प्रदूषण मुक्त ठेवण्यसाठी हातभार लावावा,
असे आवाहन उपसंचालक श्री इगवे यांनी यावेळी केले.