अभियांत्रिकीच्या स्वप्नांचा अंत गळफासात; पालकांचा महाविद्यालयावर गंभीर आरोप

आत्महत्या की…? पालकांचा महाविद्यालयावर गंभीर आरोप

लाल दिवा-नाशिक,आडगाव, 21 सप्टेंबर : (प्रतिनिधी) येथील के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मयत विद्यार्थिनीचे नाव (पिडीताचे नाव) असे असून, ती पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. मंगळवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास तिने गीताई वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक (अविनाश खैरनार) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (निकम) आणि त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. 

दरम्यान, मयत विद्यार्थिनीच्या वडिलांनी (फिर्यादीचे ) आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, “माझी मुलगी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि तेथील वसतिगृहात राहत होती. तिने आत्महत्या का केली हे मला माहित नाही. मात्र महाविद्यालयतील वसतिगृहाच्या रेक्टर उमा पुष्कर हरक आणि संस्था प्रशासन यांनी माझ्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले असून त्यांनी पुरावे नष्ट केले आहेत.” 

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निकम यांच्या नेतृत्वात तपास सुरू असून गुन्हा नोंद क्रमांक २७४/२०२४ अन्वये भादंवि कलम १०७, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक (अविनाश खैरनार) हे मार्गदर्शन करत आहेत. 

विद्यार्थिनीने आत्महत्या का केली, यामागे काही अन्य कारणे आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत. विद्यार्थिनीच्या मोबाईल फोनची तपासणी केली जात आहे. वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात येत आहे. तसेच महाविद्यालय प्रशासनाकडूनही माहिती घेतली जात आहे. 

दरम्यान, महिला सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पदमजा बढे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाची असताना अशा प्रकारे विद्यार्थिनीने आत्महत्या का केली, याचा खुलासा व्हावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
1
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!