पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांची दमदार कामगिरी……..अंबड एम.आय.डी.सी. पोलिसांनी ३९ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमालासह १५ जणांच्या आवळल्या मुसक्या…!
लाल दिवा-नाशिक,ता.२ :- एमआयडीसी चुंचाळे पोलीसांनी १५ संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक वर्षांपूर्वी अंबड औद्योगिक वसहातीत असलेल्या सिमेंस कंपनीत ४० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पोलीस करत असताना पोलीस शिपाई श्री. सावंत व श्री. सूर्यवंशी यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने त्यांच्या साथीदारांसह कंपनीत चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून २२ लाख रू किंमतीचे कॉपर, ५ लाख रू किंमतीचा जेसीबी, ०६ लाख रू किंमतीची बोलेरो पिकअप, ०६ लाख रू किंमतीच्या दोन चारचाकी गाडया, १५ हजार रू किंमतीची बाईक, ०४ हजार रुपये किंमतीचा कटर मशीन, ०६ हजार रुपये किंमतीचा व्हिल बॅरो असा एकुण ३९ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी संतोष शिंदे (वय ४२ दत्तनगर, अंबड ) लक्ष्मीकांत उमाकांत होळकर( रा. लासलगाव ता. निफाड जि.नाशिक) भारत शंकर मंजुळे ( वय ३४ रा. गुळवंच ता. सिन्नर जि.नाशिक) संजय लक्ष्मण वानखेडे वय ३६ रा.सिंहस्थनगर सिडको) शिवराम कैलास डहाळे ( वय ३७ घरकुल योजना, अंबड, नाशिक ) महेश्वर पदमसिंग भंडारी (वय ३५ व घरकुल योजना चुंचाळे शिंवार अंबड नाशिक) जनार्दन बाळु गायके वय ४३ माउली लॉन्स जवळ, अंबड)
- PC/ 2224 श्रीकांत संजय सूर्यवंशी
- PC / 1641 महेश जयवंत सावंत
नेमणूक- एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी
विनोद कांतीलाल निकाळे ( वय ३२, पंडीतनगर सिडको) राजु गोंविद शेळके (वय ४३ घरकुल अंबड ), संजय अशोकराव वाणी (वय ४० रा.सिडको ) जयेश कैलास पाटील (वय २३ रा समतानगर सातपुर) राहूल विश्वनाथ चंद्रकोर (वय २९ , उत्तनगर, सिडको नाशिक)
मोहम्मद अल्ताफ मोहम्मद हुसेन चौधरी ( वय ३२ ) जाधव संकुल अंबड नाशिक) मुस्ताक शौकतअली शेख उर्फ भु-या ( वय ३० रा. पवननगर सिडको नाशिक) हरीलाल रामलखन मौर्य ( वय ४३ रा. घरकुल योजना चुंचाळे अंबड ) यांना ताब्यात घेतले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त, संदीप कर्णीक उप आयुक्त, मोनिका राउत, सहा. पोलीस आयुक्त, शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर, सुर्यवंशी, समाधान चव्हाण,सुरेश जाधव,अर्जुन कांदळकर,दिनेश नेहे,अनिल कु-हाडे, जनार्धन ढाकणे, महेश सावंत, श्रीकांत सुर्यवंशी यांच्या पथकाने केली.