स्थिर व भविष्यात देशाच्या विकासाला अधिक गती देणारा अंतरिम बजेट ; देशाला प्रगतीपथावर नेणारे बजेट.. – दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक…!
लाल दिवा-नाशिक,ता.१ :-एप्रिल-मे मध्ये सार्वत्रिक निवडणुका असल्याने ह्या अंतरिम बजेट मध्ये सरकारने कोणत्याही मोठ्या घोषणा न करता एक स्थिर स्वरूपाचे बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये काही स्वस्त किंवा महाग झाले नाही.
पगार दार वर्गाच्या इन्कम टॅक्स लॅब मध्ये कोणतेही बदल नाही. ७ लाख पर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असणार आहे.
आयकर भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येऊन परतवा देखील त्वरित जारी केल्या जाईल.
कॉर्पोरेट टॅक्स रेट 25 वरून 20 टक्के करण्यात आल्यामुळे कराचा बोजा कमी होणार आहे.
स्टार्टअप करिता करामध्ये काही सवलत व सूट देण्यात येणार आहे.
या अर्थसंकल्पात काही गोष्टींवरील कर कमी झाल्याने त्यांच्याशी संबंधित उत्पादने स्वस्त होणार आहेत.
विकास विकास नावाखाली असलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, ग्रामीण भाग व सर्वसामान्य जनतेत मात्र नाराजी आहे.
कृषीप्रधान भारत देशात कृषी क्षेत्रासाठी तसेच शेतकऱ्यांसाठी विशेष कोणत्याही घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. केवळ सेवा व इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वरती भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे.
नव-नवीन योजनाच्या, रोजगार, कर्ज वाटप या केवळ घोषणाच प्रत्यक्ष लाभ नाहीच.
एकंदरीतच २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प हा “कही ख़ुशी कही गम” असे म्हणायला हरकत नाही.
योगेश भास्कर कातकाडे
कर सल्लागार.
बजेट प्रतिक्रिया
देशाला प्रगतीपथावर नेणारे बजेट…
या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावर्षीचे बजेट हे देशाला दिशा देणारे ठरले आहे. वंचित, शोषित, कष्टकरी शेतकरी असे सर्वसमावेशक हे बजेट आहे. येणारा काळ हा भारताचा असेल हे या बजेट मधुन अधोरेखित झाले. शेतकऱ्यांना तसेच उद्योजकांना या बजेटने भरभरून दिले आहे. भारताचे नेतृत्व योग्य हातात आहे हे आज प्रत्येक भारतीयाला वाटेल सर्वसमावेशक असे हे बजेट आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यटन, शेतकरी, महिला सक्षमीकरण, दळणवळण या सर्व बाबींचा कटाक्षाने समावेश करण्यात आला आहे.
–दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक