जाधव गोळीबार प्रकरण: एसीपी मिटके यांच्याकडे तपासाची सूत्रे
लाल दिवा-नाशिक,दि.१८: अंबड पोलीस स्टेशन येथील प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणाचा तपास आता सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. हा गुन्हा अत्यंत संवेदनशील, गंभीर, क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हा निर्णय घेतला आहे.
प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार १५ फेब्रुवारी २०२२ रोजी झाला होता. अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ७७/२०२२ अन्वये भादंवि कलम ३०७, ३४, १२० आणि भारतीय शस्त्रास्त्र कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल अडीच वर्षांनी गुंडाविरोधी पथक आणि गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
तपासात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दिपक बडगुजर हा या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
या पार्श्वभूमीवर, हा गुन्हा अत्यंत संवेदनशील असल्याने आता त्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.