आम आदमी पार्टीतले काही लोक आता “आम” राहिले नसून “खास” झाले आहेत……चंदन पवार यांचा आम आदमी पार्टीच्या राज्य मिडिया प्रमुख पदाचा राजीनामा….!

लाल दिवा : आम आदमी पार्टीचे राज्य मिडिया प्रमुख चंदन पवार यांनी पार्टीचे प्राथमिक सदश्यत्व आणि राज्य मिडिया प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे, राजीनामा देतांना त्यानीं मिडियाशी बोलतांना सांगितले की, आम आदमी पार्टीत काम करीत असताना अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्यात, पार्टीच्या सहकाऱ्यांनी सोबत राहून व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी माझ्या सोबत मेहनत घेतली, त्याबद्दल पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सह-प्रभारी गोपाल ईटालिया यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो, पार्टी सोडतांना खूप दुःख होत असले तरी मला हा कठीण निर्णय मला माझ्या व्यक्तिगत कारणासाठी घ्यावा लागला, त्याबद्दल मी कुणालाही याचा दोषी मानत नाही.

 

फक्त जाता जाता एक मनाची खंत व्यक्त करतो, की आम आदमी पार्टीतले काही लोक आता “आम” राहिले नसून “खास” झाले आहेत, कृपया माझ्या मताला किंवा विचारांना आम आदमी पार्टीच्या वरिष्ठांनी विरोध न समजता, पार्टीसाठी सकारात्मक सूचना म्हणून घ्यावे, जेणेकरून पार्टीच्या प्रगतीसाठी पोषक राहील, पक्षातील माझे सर्व सहकारी व्यक्ती म्हणून खरंच ग्रेट आहेत त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो, मला पार्टीत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री तथा राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि राष्ट्रीय महासचिव संघटन डॉ. संदीप पाठक यांनाही धन्यवाद देतो.

 

 

 

  • पत्रकार परिषद

 

दिनांक:- 20.02.2024

 

  • 1. आम आदमी पार्टीतले वरिष्ठ नेते आता, “आम” राहिले नसून “खास” झाले आहेत.

 

  • 2. पार्टीत असे अनेक लोक आहेत जे पार्टीसाठी काम करीत नसून, स्वतःचे महत्त्व दाखविण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांचा सामान्य लोकांशी संबंध तुटलां आहे.

 

  • 3. मी राज्याचा पदाधिकारी असूनही माझ्या सर्वोच्च नेत्याला मी भेटू शकत नव्हतो,, कारण मध्ये अनेक बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यात आले आहेत.

 

  • 4. अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी पार्टीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधूनही त्यांची भेट होत नाही, प्रत्येकाने आपले इम्पॉर्टन्स दाखविले आहे, ह्यांचे असे वर्तन बघून मी माननीय केजरीवाल यांना भेटण्यासाठी अनेक मेल केलेत, त्यालाही सकारात्मक प्रतिसाद आला नाही, आम आदमीचा नेता जर राज्याच्या पदाधिकाऱ्यांनाही भेटत नसेल तर बाकी सामान्य माणसांची काय अवस्था असेल?

 

  • 5. मी महाराष्ट्राच्या आताच्या राहिलेल्या पार्टीतील राज्याच्या वरिष्ठ नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना चॅलेंज देतो त्यांनी एक महिन्याचां वेळ घ्यावा आणि अरविंद केजरीवालांना कुणाचीही मदत न घेता भेटून दाखवावे. ज्याप्रमाणे आज कुणीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे / माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात त्यांच्या दालनात जाऊन सहज भेटू शकतात.

 

  • 6.माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ह्या महिन्यात जेंव्हा नाशिक मध्ये आलेत, तेव्हा नाशिकचा एक एक कार्यकर्ता आणि पदाधिकारी त्यांना पर्सनली भेटला, हीच व्यवस्था प्रत्येक पार्टीत आहे, परंतु आम आदमी पार्टीत नाही.

 

  • 7. अरविंद केजरीवाल यांना न भेटू देण्याचा चमत्कार फक्त माझ्यासोबत झाला नसून हाच अनुभव अनेक कार्यकर्त्यांचा आहे, त्यात उदाहरण म्हणून मी छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष कोमल हुपेंडी यांचे देतो, आता त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, ते एव्हढ्या मोठ्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष असताना देखील त्यांना अजून पर्यन्त अरविंद केजरीवाल यांना भेटू दिलेले नाही हे त्यांनी स्वतः मला सांगितले आहे, प्रचाराच्या वेळेस फक्त स्टेज शेअर केले होते, त्या स्टेजवर सुद्धा त्यांना अरविंद केजरीवालांना बोलण्याची परमिशन नव्हती.

 

  • 8. आम आदमी पार्टीत येण्यासाठी महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या राजकारण्यांनी, उद्योगपतींनी, विशेष व्यक्तींनी मागील पाच सहा वर्षात आप पार्टीच्या दिल्लीतील आणि मुंबईत बसलेल्या सो कॉल्ड नेत्यांशी संपर्क साधला, परंतु कुणीही त्यांना महत्त्व न दिल्यामुळे आज ते पार्टीत नाहीत, पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना भेटूनही त्यांना पक्षात घेतले नाही, कारण ते आले असते तर ह्यांचे महत्व कमी झाले असते, हा जो पार्टी विरोधी अजेंडा पार्टीतीलच लोकांनी चालविला आहे तो पक्षाला खूपच घातक आहे.
  • 9. आम आदमी पार्टीतील लोकांना मोठमोठी पदे दिली जातात, परंतु अधिकार दिले जात नाहीत, थोडक्यात “ओसाड गावचा पाटील” अशी अवस्था करून टाकली आहे.
  • 10. आणि शेवटचे सांगतो…मी आम आदमी पार्टीच्या कुठल्याही नेत्यावर व्यक्तिगत टिप्पणी करणार नाही, परंतु पक्षांतर्गत असलेली व्यवस्था ही कुठल्याही आम आदमीला पटण्यासारखी नाही, आप पार्टीला मी एकच सल्ला देईल, तुम्ही आम आदमी म्हणून सत्तेवर आलात, परंतू आता तुम्ही खास झाल्यामुळे पार्टीचे पतन होण्यास सूरवात झाली आहे, अजूनही वेळ आहे पार्टीला सांभाळा .

 

  • धन्यवाद

  • चंदन पवार

  • पुर्व राज्य मिडिया प्रमूख,

  • आप, महाराष्ट्र

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!