मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाख महिलांची नोंदणी …!

लाल दिवा-नाशिक,दि .23 :- राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 57 हजार 74 महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये 3 लाख 69 हजार 696 महिलांनी ऑफलाईन तर 2 लाख 87 हजार 378 महिलांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नागरी अंगणवाडी, ग्रामीण क्षेत्र अशी मिळून आहे. प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

 

महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्रात 73 हजार 437, नागरी अंगणवाडी क्षेत्रात 57 हजार 343 आणि ग्रामीण भागात 5 लाख, 26 हजार 294 असे एकूण 6 लाख 57 हजार 74 अर्ज प्राप्त आहेत. नगरपालिका, नागरी अंगणवाडी, ग्रामीण क्षेत्रातील महिलांची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 29 लाख 44 हजार 791 असून या संख्येच्या प्रमाणात 6 लाख 57 हजार 74 अर्ज प्राप्त आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण उभारण्यात आलेल्या मदत कक्षांची संख्या 5 हजार 797 इतकी आहे.

 

राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविल्यामुळे अंमलबजावणी अत्यंत सुलभ होणार असून अर्ज दाखल करणे सोपे होणार असल्याने जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांचा नोंदणीसाठी प्रतिसाद दिसून येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!