गोवंश जनावरांची कत्तल करणारा तडीपार इसम जेरबंद……… गुन्हेशाखा युनिट-२ ची जबरदस्त कामगीरी…..!
लाल दिवा -नाशिक,१९:- ( दि.१९) जुन रोजी युनिट क २ कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक व चालक पोलीस हवालदार अतुल पाटील यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, भदकाली घासबाजार येथील स्लॉटर हाउस मध्ये गोवंश जनावरांची कत्तल चालु आहे अशी गोपनिय माहीती मिळाल्याने सदर बातमी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विदयासागर श्रीमनवार यांना कळविल्याने त्यांनी सदरची बातमीची खात्री करून कारवाई करा असे आदेशीत केल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली स्लॉटर हाउस घास बाजार येथे इसम नामे रफिक जाफर कुरेशी, वय-५६ वर्ष, रा. वडाळागांव, नाशिक हा गोवंश जनावरांची कत्तल करतांना मिळुन आला त्यास ताब्यात घेतले असता त्यास नाशिक शहर व ग्रमिण हददीतुन तडीपार केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच गोवंश जनावरे हे कत्तल साठी आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे ताब्यातुन ६०, हजार रू किं.चे गोवंश मांस व २०, हजार रू.किं चा एक जिवंत गोहा अस एकुन ८०, हजार पाचशे रू. किं. चा मुददेमाल हस्तगत करून भद्रकाली पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, भद्रकाली पो. ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट कं.२ कडील सपोउनिरी पाठक, बेडकोळी, पोहवा संजय सानप, वाल्मीक चव्हाण, अतुल पाटील व भद्रकाली पो. ठाणे कडील सपोउनिरी गांगुर्डे, पोहवा साळुंके, सैयद, पोलीस नाईक मुंद्रे यांनी केलेली