“शिंदे” गटाच्या संपर्क कार्यालयासमोर जाऊन आव्हान देणाऱ्या त्या “शिवसैनिका”वर होतोय कौतुकाचा वर्षाव !
लाल दिवा : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतत शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. यादरम्यान त्रंबकेश्वर त्यांनी भेट दिली. त्रंबकेश्वर रस्त्यावर मायको सर्कल येथे शिंदे गटाचे संपर्क कार्यालय आहे. खासदार राऊत या रस्त्याने येणार असल्याने शिंदे गट देखील कार्यालयासमोर आक्रमक झाले होते. खासदार राऊत यांचा ताफा येत असताना त्याच ठिकाणी ठाकरे गटाच्या एका कट्टर कार्यकर्त्यांने संजय राऊत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा दिल्या.
त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. या दरम्यान शिंदे घाटाचा कार्यकर्ता ठाकरे गटाच्या त्या कार्यकर्त्यावर धावून गेला. दोघांमध्ये हाणामारी होणार तोच पोलिसांनी सावरासावर केली. संबंधित ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला पोलीसानी गाडीत बसविले. आणि पुढील अनर्थ टळला. मात्र संपूर्ण शहरांमध्ये ठाकरे गटाच्या त्या कार्यकर्त्याची जोरदार चर्चा आहे एकमेव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या कार्यालयासमोर जाऊन अशा प्रकारच्या घोषणा दिल्याने त्यांच्या या कामाचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे.