शेवगाव च्या क्लासिक ब्रीज कंपनीला ” किंग ऑफ शेअर मार्केट ” पुरस्कार जाहीर…!
लाल दिवा : ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा दिल्याबद्दल शेवगाव येथील क्लासिक ब्रीज कंपनीला ” किंग ऑफ शेअर मार्केट ” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 18 मार्च रोजी नाशिक येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. शेवगाव आणि परिसरातील गुंतवणूकदार आणि नागरिक यांच्याकडून क्लासिक ब्रीज कंपनीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
क्लासिक ब्रीज शेअर मार्केट मध्ये ग्राहकांना सेवा पुरवते. ग्राहकांकडून गुंतवणूक घेऊन त्यांना सर्वाधिक परतावा देत आहे. शेवगाव तालुक्यातील कंपनीचे 2 महिन्यात सर्वाधिक ग्राहक तयार झाले आहेत. या सर्व ग्राहकांना गुंतवणूकीच्या मोबदल्यात करारनामा आणि चेक देखील दिले जातात. त्यामुळे ग्राहकांना येथे गुंतवणूक करणे अतिशय सुरक्षित आणि महत्वाचे वाटते.दोन महिन्यात कंपनीने लोकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास हा अभिमानास्पद आहे.या सर्व गोष्टी पाहून नाशिक येथील ” द रिसेल.इन ” या संस्थेने क्लासिक ब्रीज ल हा पुरस्कार देण्याचे घोषित केले आहे. या पुरस्काराबद्दल ग्राहकांनी तसेच शेवगाव येथील राजकीय,सामाजिक,आर्थिक क्षेत्रातील दिग्गज लोकांनी कंपनीचे अभिनंदन केले आहे.