मोबाईल फोडला म्हणून जीव गमावला…… शेजारच्या मुलाने बाईच्या डोक्यात हातोडी टाकून ठार केले… मृतदेह गोणीत भरून पाण्याच्या टाकीत फेकला…. एवढे करूनही पोलिसांनी मात्र आरोपीस अखेर हुडकून काढले…..!

लाल दिवा : मोबाईल वर गेम खेळत असलेल्या मुलाने शेजारच्या महिलेला मोबाईल दिला नाही म्हणून महिलेने तो मोबाईल हिसकावून खाली फेकून फोडला. त्यामुळे डोक्यात तिडस गेल्याने मुलाने महिलेच्या डोक्यात हातोडी मारून तिचा खून केल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी सकाळी गुरुद्वारा समोरील एका इमारतीच्या बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी पाण्याच्या डबक्यात महिलेचे प्रेत मिळून आल्याने खळबळ उडाली होती. तो मृतदेह महिला सोनाली भानुदास काळे (वय 24) यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते. ती 17 फेब्रुवारी रोजी घरातून बेपत्ता झाल्याची खबर उपनगर पोलिसात देण्यात आली होती.

मृतदेह मिळून आल्यानंतर मयत महिलेच्या माहेरील मंडळीनी सोनाली हिस तिच्या सासू, सासरा, नवरा, दीर, जाऊबाई यांनी मारून टाकल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले. मात्र पोलिसांनी त्यावर समाधानी न राहता तपास सुरूच ठेवला आणि तपासाला वेगळे वळण मिळाले.

याबाबत उपायुक्त राऊत यांनी सांगितले की, 17 फेब्रुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोनाली आणि तिच्या सासू मध्ये कडाक्याचे भांडण झाले. झालेला वाद नवऱ्याला मोबाईल वर सांगण्यासाठी सोनाली हिने नेहमी प्रमाणे शेजारील अल्पवयीन मुलाकडे मोबाईल मागितला. मुलगा मोबाईल मध्ये गेम खेळण्यात दंग असल्याने त्याने मोबाईल देण्यास नकार दिला.

संतप्त महिलेने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून तो खाली फेकला, त्यात तो फुटला. मोबाईल फुटल्याचे पाहताच मुलाच्या डोक्यात प्रचंड तिडस निर्माण झाली व त्याने तत्काळ शेजारी पडलेला हातोडा महिलेच्या डोक्यात व चेहऱ्यावर मारला. भुरळ आल्याने सोनाली खाली कोसळली. आपल्या हातून काय झाले? असा विचार करून सोनाली हिस घरा शेजारील खुराड्यात त्याने लपवले.

सोनालीची सासू व जाऊबाई ह्या सोनालीचा शोध घेऊ लागल्या, मात्र रागामध्ये गेली असेल, येईल पुन्हा असा विचार करून त्या दोघी कामानिमित्त बाहेर गेल्या.

अल्पवयीन मुलाने घरी कोणी नसल्याचे पाहत सोनालीला खुराड्या बाहेर काढीत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह प्लस्टिकच्या गोणीत गुंडाळून काम चालू असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या खड्ड्यात फेकून दिला.

सदर अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी, पोलीस हवालदार विनोद लखन, इम्रान शेख, पंकज कर्पे, गौरव गवळी, अनिल शिंदे, जयंत शिंदे, संदेश रघतवान, मुकेश क्षीरसागर, राहुल जगताप, सुरज गवळी, सौरभ लोंढे, मिलिंद बागुल, सतीश मढवई आदीनी केली..

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!