युवा दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे शरद युवा सन्मानाचे पुरस्कार वितरण…!
विशेष प्रतिनिधी -विक्रांत डहाळे
लाल दिवा-नाशिक,ता.१३ : संपूर्ण देशात २७ व्या राष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर युवकांचा सन्मान करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुंबई नाका कार्यालय येथे नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या युवक युवती व शालेय विद्यार्थ्यांना शरद युवा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पुरस्कृत विद्यार्थ्यांच्या पालकांना आदर्श पालक म्हणून गौरविण्यात आले.
देशात युवकांना नवीन आशा नवीन दिशा देण्याचे काम करत विविध क्षेत्रात अध्यक्षपद भूषविलेल्या शरद पवार साहेबांच्या नावाने हा पुरस्कार शरद युवा सन्मान म्हणून देण्यात येत असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांनी केले.
तरुणांनी संधीचा शोध घेत योग्य मार्गदर्शन प्राप्त करत त्यांच्या आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करावे व त्या त्या क्षेत्रात नावलौकिक कमवावा व आपले करिअर घडवावे असा आशावाद यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी महापौर प्रकाश मते यांनी केले.
प्रत्येक क्षेत्रात वशिलेबाजी व वाटमारीमुळे युवकांचे खच्चीकरण होत आहे अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध विंग्स त्या त्या क्षेत्रातील युवकांच्या पाठीशी राहतील व त्यांच्या अडचणींना योग्य मार्गदर्शन केले जाईल तसेच आजच्या या पुरस्काराला उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांचे भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत गजानन शेलार यांनी आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करा असे म्हटले. यावेळी कला क्रीडा साहित्य अथलेटिक नाट्य क्षेत्र चित्रपट तसेच विविध क्षेत्रातील युवक युवतींचा शरद युवा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर प्रकाश मते शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, सरचिटणीस शहरजिल्हा मुन्नाभाई अन्सारी,महिला शहराध्यक्ष अनिता दामले राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे शहराध्यक्ष बाळा निगळ यांच्यासह सामाजिक न्याय चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख भारत जाधव, राष्ट्रवादी शहराचे नेते वसंत ठाकरे, पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक पाटील मोगल, नाशिक रोड विभाग अध्यक्ष सचिन आहेर , सातपूर विभाग अध्यक्ष प्रवीण नागरे, सिडको विभाग अध्यक्ष विजय मटाले, कार्याध्यक्ष कृष्णा काळे, मध्य विधानसभा अध्यक्ष सागर बेदरकर, प्रदेश सरचिटणीस शादाब सय्यद, मध्य विधानसभा युवक अध्यक्ष मोइन खतीब, वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत गायकवाड, प्रदेश सचिव विद्यार्थी रमिज पठाण, प्रभाग अध्यक्ष सचिन उशीर, युवक सरचिटणीस गौरव सोनवणे, प्रवीण बैसाखी, युवराज मुठाल, हरीष उबरानी, साजिद शेख, इमरान सय्यद,सातपूर महिला अध्यक्ष रूपाली काटे योगिता पाटील केतन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण नागरे यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष बाळा निगळ यांनी केले.