अंबड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार उतरले रस्त्यावर.
गुन्हेगार टवाळखोरांची धावा धावा..
- नागरिकांकडून पोलिसांच्या ॲक्शन मोडचे स्वागत……!.
लाल दिवा …….गुन्हेगारी व टवाळखोरी कमी करण्यासाठी अंबड पोलीस रस्त्यावर उतरले आहे. यामध्ये रस्त्यावर अंडा भुर्जीसह खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर मद्यपान करणाऱ्या मद्यपींना पोलिसांनी चांगला चोप दिला आहे. अचानक रस्त्यावर उतरलेले पोलीस पाहून अनेकांची झिंग उतरल्याचे दिसून आले.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मध्ये वाढ होत चालली आहे. घरफोडी, दुचाकी चोरी, जबरी लूट या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली वावरत होते. त्यात नुकताच नव्याने पदभार घेतलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी हद्दीतील गुन्हेगारी आणि रस्त्यावरील टवाळखोरी मोडीत काढण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. शनिवार दि. १० रोजी रात्रीच्या सुमारास पाथर्डी फाटा, त्रिमूर्ती चौक, महालक्ष्मी नगर आदी भागात रस्त्याच्या कडेला उघड्यावर तसेच चायनीज, अंडा भुर्जीच्या गाड्यांवर बिनधास्त मद्यपान करणाऱ्यांवर आपला दंडुका उगारला आहे. या कारवाई दरम्यान ३० मद्यपींविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टवाळखोरी तसेच रस्त्याच्या कडेला, अंडा भुर्जींच्या गाड्यांवर मद्यपान करणाऱ्या मद्यपींना पोलिसांनी चांगला चोप दिला आहे. मद्यपानकरुन रस्त्यावर गोंधळ घालणे, टवाळखोरी करणे, महिलांची छेड काढणे आदी प्रकारच्या तक्रारी अंबड पोलिसांना आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडवर आले आहे. यासंदर्भात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार स्व:ता रस्त्यावर उतरून रोडरोमिओ व मद्यपींना चांगलाच पोलिसी हिसका दाखविला. पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांचे व मद्यपिंचे चांगलेच धाबे दणाणले आहे.पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. सदर कारवाई सातत्यांने होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदरची करवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर चौधरी,सजय पाटील, कुणाल राठोड, मयूर पवार , उमेश मानकर, राकेश राऊत, सागर जाधव, राहुल जगझाप, अरुण चव्हाण , अशोक शिरकांडे, किरण देशमुख, रमेश पवार, आदींनी केली आहे.