पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या मद्यपी गुंडांवर गुन्हा दाखल…… तडीपरिचा प्रस्ताव पाठविणार…..वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व मनोहर कारंडे यांनी बजावली महत्त्वाची भूमिका……. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पत्रकारांनी व्यक्त केले समाधान….!
लाल दिवा-नाशिक,ता३०.सिडको
बडदेनगर येथील कुबेर लॉन्स परिसरात काही इसम भर चौकात दारू पिऊन येथील महिला व नागरिकांची छेडछाड करीत शिवीगाळ करीत असताना त्या मद्यपींना हटकण्यासाठी गेलेल्या युवकाला मद्यपिंकडून मारहाण करी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे श्री. शेख व पवन परदेशी यांनी जागेवर जाऊन गुंडांच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५:४५ वाजेच्या सुमारास बडदेनगर शिवाजी चौक या ठिकाणी शिवसेना शाखा ओपनिंग चा कार्यक्रम सुरू होता. यावेळी कार्यक्रम कव्हर करण्यासाठी काही पत्रकार आले होते. येथे जमलेल्या नागरिकांनी एका पत्रकारास सांगितले की, बडदेनगर कुबेर लॉस परिसरात काही मध्यपान करणारी युवक नागरिकांना शिवेगाळ करीत छेडछाहाणी करत आहे. घटनेची माहिती घेण्याकरिता गेलेले पत्रकार किरण कारभारी आहेर (वय ४९ हनुमान चौक, सिडको नाशिक ) यांनी भर चौकात मद्यपान करणाऱ्या दोन संशयितांची व्हिडिओ शूटिंग काढत पोलिसांना घटनेची माहिती दिली. सदर बाब मद्यपींना समजल्यानंतर मध्यपिंनी आमची शूटिंग काढतो का रे, असे म्हणत पत्रकारास शिवीगाळ करीत लाथा बुक्क्यांनी तसेच हातात चापटीने मारहाण करण्यास सुरुवात केली. डोक्यात दारूची बाटली उगारत त्याच्या दिशेने दगड फिरकावला तसेच आम्हाला ज्या ठिकाणी दिसतील तिथे तुझा मुद्दा पाडू, असे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयित सिद्धार्थ नवले तसेच एका साथीदारा विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रहार करणारे संशयित रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.