ग्रामसेवकासह सरपंचाला १५ हजारांची लाच घेताना अटक…!
लाल दिवा.नाशिक ,ता .९ : तक्रारदार यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये बोराळे ग्रामपंचायतचे लोखंडी जिन्याचे काम 50 हजार रुपये करण्यासाठी घेतले होते. सदर कामाची उर्वरित 20 हजार त्यांचे किंवा मुलाचे अकाऊंटवर जमा करण्यासाठी संशयित क्र 2 सरपंच बाकेराव भाऊसाहेब जाधव (वय 50वर्षे धंदा सरपंच, बोराळे ग्रामपंचायत ता चांदवड जि नाशिक)
यांनी 15 हजार रुपये फोनद्वारे लाचेची मागणी केली. संशयित क्र 1 कंत्राटी ग्रामसेवक (वर्ग-3) बोराळे आतिश अभिमान शेवाळे (वय 28 वर्ष, कंत्राटी
ग्रामसेवक (वर्ग- 3) बोराळे ग्रामपंचायत ता
चांदवड जि. नाशिक) यांनी स्वतःसाठी 7 हजार 500/- रुपये व इलो क्र 2 सरपंच बाकेराव भाऊसाहेब जाधव (वय 50वर्षे धंदा सरपंच, बोराळे ग्रामपंचायत ता चांदवड जि नाशिक) यांचेसाठी 7 हजार 500/-रुपये लाचेची तक्रारदार यांच्याकडे अशी एकूण 15 हजार – रुपये लाचेची मागणी केली. आलोसे क्रमांक 1 आतिश अभिमान शेवाळे (वय 28 वर्ष. कंत्राटी ग्रामसेवक) यांनी 15 हजार रुपये लाचेची रक्कम ही पंचासमक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. आलोसे व इलोसे यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, उप अधीक्षक वैशाली पाटील, पो. ना. शरद हेंबाडे, पो. ना. राजेंद्र गिते परशराम जाधव आदीच्या पथकाने केली.