गोवंश कत्तल करणाऱ्या हत्याऱ्यांना पोलीस आयुक्त कर्णिक यांचा सज्जड इशारा……वडाळा गावात पोलिसांची कारवाई ११ गुरांची सुटका…. प्राणी मित्रांनी मानले पोलीस आयुक्तांचे आभार….!
लाल दिवा-नाशिक,ता.७ : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळा गाव येथील मुमताज नगर येथील कत्तलखान्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार व त्यांच्या अमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकत 11 गाईंची जिवंत सुटका केली या कारवाई दरम्यान प्रचंड गोपनीयता पाळण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे त्याचप्रमाणे संशयित आरोपी बबलू कुरेशी व इमरान शहा या दोन गोवंशांची कत्तल करणाऱ्या जल्लादांना बेड्या ठोकत 11 गाईंची सुखरूप सुटका करत एक लाख 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) कायदा १९९५ अन्वये गोवंशाची कत्तल वाहतूक करण्याचा गुन्हा बेजमानती दखलपात्र करण्यात आला आहे…
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार पोलीस हवालदार पारणकर, शेख, खान, पोलीस नाईक परदेशी, जाधव, पाठक, नागरे आदींनी केले आहे..