राकेश कोष्टी वर गोळीबार करणारा मुख्य आरोपी सागर पवार यास गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद !
लाल दिवा, ता. २२ : दिनांक १६/०४/२०२३ रोजी अंबड पोलीस ठाणे हद्यीत भरदिवसा बाजीप्रभु चौक सिडको येथे फिर्यादी उमेश जालिंदर गवई व त्याचा साथीदार राकेश कोष्टी यांचेवर गोळीबार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन अंबड पोलीस ठाणे येथे भादंविक ३०७ सह शस्त्र अधि कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्याकरिता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव यांनी गुन्हे शाखा विभाग तसेच गुंडा विरोधी पथक यांना आदेशीत केले होते.
त्याअनुषंगाने दिनांक २२/०४/२०२३ रोजी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर गोळीबार करणारे गुन्हयातील मुख्य फरार आरोपी गोदावरी नदीच्या परिसरात नाशिकरोड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर परिसरात सापळा रचुन शिताफीने आरोपीताचा पाठलाग करुन गुन्हयातील आरोपी सागर कचरु पवार वय २८ वर्ष रा. गणेशवाडी, पंचवटी, नाशिक, पवन दत्तात्रय पुजारी वय २३ वर्ष रा. तारवालाला नगर पंचवटी नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपासकामी अंबड पोलीस ठाणे येथे तपासी अधिकारी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.