हरिओम सांस्कृतिक संस्था समाजातर्फे होणाऱ्या रौप्यमहोत्सवी मेळाव्यात आर्थिक दुर्बल वधू-वरांना मदतीचा हात….!
लाल दिवा-नाशिक,ता.८ : सिडको नाशिक जिल्हा अहिर सुवर्णकार समाज हरिओम सांस्कृतिक संस्थेच्या वतीने रविवार दि १० डिसेंबर २३ रोजी बालाजी लान्स, गंगापूर रोड येथे २५ वा रौप्यमहोत्सवी मेळावा आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने संस्थेची सोनार वाडा येथे सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्याप्रसंगी बोलताना आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्याला आयुष्याचा जोडीदार चांगला मिळावा, अशी सर्वांचीच इच्छा असते. मात्र, शिक्षित असूनही केवळ घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे समाजातील आर्थिक दुर्बल वधू-वरांना आपले स्वप्न साकारता येत नाही. अशा वधू- वरांना संस्थेतर्फे मदतीचा हात दिला जाणार आहे. असे मत संस्थेचे अध्यक्ष प्रकाश थोरात यांनी व्यक्त केले.
संस्थेचे मेळावा प्रमुख किरण दुसाने यांनी यावेळी बोलताना संस्थेच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. तसेच मेळाव्यास महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अंदाजे ७००० ते ८००० लोक उपस्थित राहू शकतील असा अंदाज व्यक्त केला. आदल्या दिवशी बाहेरून येणाऱ्या समाजबांधवांची राहण्याची, जेवण्याची सोय तसेच अशोकस्तंभ व मुंबई महामार्ग ते मेळावा स्थळापर्यंत वाहनाची व्यवस्था केली आहे. सोय संस्थेमार्फत मोफत केली जाईल. मुक्काम व जेवण्याची व्यवस्था योगेश
विसपुते ९८९०५५९६५५ तसेच वाहनाची व्यवस्था संदीप खरोटे ८२३७५०४०५७ व मंगेश पाटील ९९२१२२४८४०, संस्थेचे संस्थापक स्व. विजयकुमार पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त संस्कार दिन साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात अहिर सुवर्णकार समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित असतात. या दिवसाचे औचित्य साधून संस्थेतर्फे दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. यावर्षी गोशाळेत गोमातेस चारा देऊन तसेच गोमातेचे संगोपन संस्थेतर्फे कसे करता येईल यावर
चर्चा झाली.
हरिओम संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय मेळाव्याचा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश थोरात, संतोष सोनार, मनोज जानोरकर, शशिकांत अहिरराव, योगेश दुसणीस, प्रसन्ना इंदोरकर, चारुहास घोडके, सुनील बाविस्कर, महेश घोडके, अनिल दुसाने, श्याम बागुल, संदीप सोनार, अशोक विभांडिक, प्रकाश वडनेरे, वर्षाताई दंडगव्हाळ, सुवर्णाताई घोडके, वृंदाताई जाधव, पूनमताई वानखेडे आदींनी केले आहे.