केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहसचिव आराधना पटनाईक यांच्याकडून राज्याच्या आरोग्य योजनांचा आढावा….!

लाल दिवा-मुंबई, दि. १९: केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या सहसचिव श्रीमती आराधना पटनाईक व वरिष्ठ सल्लागार डॉ. शशांक शर्मा यांनी आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या योजना, पायाभूत सोयी सुविधांची कामे आदींचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या योजना, उपक्रम आदींबाबत निर्देश दिले. यावेळी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक (वित्त) जयगोपाल मेनन, सहसंचालक (तांत्रिक) विजय बाविस्कर, सहसंचालक विजय कंदेवाड, सहसंचालक (अतांत्रिक) सुभाष बोरकर, आदी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त धीरज कुमार यांनी राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या योजना, उपक्रम यांची माहिती दिली. बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आभा कार्ड वाटप, मातृ वंदन योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पायाभूत सुविधांची कामे, आयुष्यमान भव: मोहीम, आयुष्यमान आरोग्य मंदिर, सिकलसेल व क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आदींचा आढावा घेण्यात आला. सहसचिव श्रीमती पटनाईक २० जानेवारी रोजी रायगड जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना भेटीसुद्धा देणार आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!