महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: सुसूत्र आणि पारदर्शी निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज, मुंबईत तयारीचा आढावा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम, निवडणूक आयोगाचे मुंबईत डेरे!

मुंबई, २६ सप्टेंबर (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी रात्री मुंबईत पदार्पण केले.

यावेळी त्यांच्यासोबत निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू हे देखील उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री ८ वाजता त्यांचे आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग, उपनिवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उपनिवडणूक आयुक्त अजित कुमार, उपनिवडणूक आयुक्त मनोजकुमार साहू, उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार आणि आयोगाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दोन दिवसीय (२७ आणि २८ सप्टेंबर) या भेटीदरम्यान, भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव आणि राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकाऱ्यांसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठका घेणार आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!