पोलीस मुख्यालयात स्टेशन डायरी ऑनलाइन प्रणालीत सुरु करून अद्यावत करणे बाबत निवेदन..!
लाल दिवा,ता. २० : जळगाव पोलीस मुख्यालयात स्टेशन डायरी ऑनलाइन करावी व त्यात पारदर्शकता आणावी अशा प्रकारचा अर्ज माहिती अधिकारी दीपक कुमार गुप्ता यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या अर्जा द्वारे केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या मागणीला न्याय मिळतो का… ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दीपककुमार पी. गुप्ता, सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी जळगाव पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जाचा मसुदा पुढीलप्रमाणे, जळगाव पोलीस मुख्यालयातील अनेक कर्मचारी यांनी शिस्तीचे खाते असल्याने नाव पुढे येवू नये या अटीवर पोलीस खात्यातील समस्या तोंडी सांगून त्यावर तोडगा काढण्याची विनंती केलेली आहे. त्यानुसार मी सामाजिक कार्यकर्ता या नात्याने आपल्याला त्यांची समस्या खालीलप्रमाणे मांडत आहे,
१) जळगाव पोलीस मुख्यालयातील स्टेशन डायरी ONLINE नसल्याने पोलीस कर्मचारी यांची ड्यूटी लावताना त्यामध्ये पारदर्शकता राहत नाही.
२ जे पोलीस कर्मचारी पैसे देतात त्यांना सोयीचे ठिकाणी ड्यूटी लावली जाते किंवा त्यांना प्रत्यक्ष ड्यूटी न लावता नंतर कागदोपत्री ड्युटी ADJEST केली जाते. ( उदा. एखादी आरोपी पार्टी/ बंदोबस्त वैगेरे करिता प्रत्यक्ष ड्यूटीसाठी लावताना ४ पोलीस कर्मचारी नेमले जातात व आरोपी पार्टी / बंदोबस्त वैगेरे सुरक्षित परत आले नंतर त्या ड्युटीमध्ये पैसे देणारे इतर अधिक कर्मचारी ADJEST केले जातात. म्हणजे ड्युटीवर जाताना प्रत्यक्ष ४/५ ई. कर्मचारी असतात व सुरक्षित परत आले नंतर OFFLINE स्टेशन डायरी व ड्यूटी रजिस्टर मध्ये ५/६/७/८ इत्यादी कर्मचारी ड्युटीसाठी दाखवले जातात).
३) रजेवर सोडण्यासाठी पैसे घेतले जातात व पैसे नाही दिले तर त्यांना विविध कारणे ( बंदोबस्त आहे/ कर्मचारी रजेवर आहे/ लोक शिल्लक नाहीत/ शिर्डी बंदोबस्तला लोक पाठवायची आहे वैगेरे ) दाखवून रजा नाकारली जाते परंतु पैसे दिले कि मग लगेच मंजूर होते.
४) ज्या भागात बंदोबस्त/ड्युटी असेल तिथे त्या भागात राहणारा कर्मचारी न टाकता दुसऱ्या भागात राहणारे कर्मचारी टाकले जातात मग ती ड्युटी रद्द करण्यासाठी देखील पैसे घेतले जातात.
(उदा. एकाच दिवशी रावेर व चाळीसगाव येथे एखादा बंदोबस्त/ड्युटी आहे तर तिथे त्रास देण्याचे उद्देशाने/पैशाचे अपेक्षाने चाळीसगाव येथे राहणारे कर्मचारी यांना रावेरला व रावेर येथे राहणारे कर्मचारी यांना चाळीसगाव येथे मुद्दाम ड्युटी टाकली जाते, मग तो कर्मचारी जो पर्यंत पैसे देत नाही तो पर्यंत त्या कर्मचारीला सोयीस्कर ठरेल अशा भागात ड्युटी दिली जात नाही)
५) गरज नसताना जळगाव पोलीस स्पोर्ट मध्ये टेनिस ग्राउंडवर ६ व फुटबॉल ग्राउंडवर ४/६ कर्मचारी नेमले जाते.
६) परेड ग्राउंडकरिता गरज नसताना ६ कर्मचारी नेमले जाते.
७) पाणी पिकेट करिता गरज नसताना ८ कर्मचारी नेमले जातात व प्रत्यक्ष एकच कर्मचारी असतो.
८) लाईन पिकेट, करिता गरज नसताना१२/१३ कर्मचारी नेमले जातात व प्रत्यक्ष १/२ कर्मचारी असतात.
९) जिम करिता गरज नसताना ४ कर्मचारी नेमले जातात व प्रत्यक्ष १/२ कर्मचारी असतो.
१०) हजेरीवर जास्तीत जास्त कर्मचारी हजर राहणे आवश्यक असताना फक्त १५ ते २० कर्मचारी हजर असतात.
११) सेटिंगवाले बरेचसे कर्मचारी रिझर्व ठेवले जातात किंवा जवळपास सोयीस्कर ड्युटी दिली जाते.
१२) बरेच काही कर्मचारी पैसे देवून वर्षानुवर्ष एकाच ड्युटीवर चिटकून बसलेले आहेत.
१३) ज्या रजिस्टरमध्ये ड्युटी लावली जाते त्याची फोटो कॉपी त्याचवेळी (ड्युटी वाटप नंतर लगेचच) पोलीस मुख्यालयचे whatsup ग्रुपवर टाकलीच जात नाही किंवा त्याची एक सत्यापित प्रत जळगाव पोलीस मुख्यालय येथील दर्शनी भागावर लावली जात नाही.
प्रत्यक्ष ड्युटी वर न जाता बहुतेक कर्मचारी त्यांचे जवळचे व्यक्ती किंवा नातेवाईकाचे नावावर डंपर /वाहन घेवून अवैध रेती व्यवसायात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रित्या सामील/भागीदार झालेले आहेत. व पोलीस मुख्यालय येथून जिथे १/२/३/ कर्मचारी ड्युटी साठी आवश्यक असताना तिथे पैसे घेवून अतिरिक्त कर्मचारी ड्युटीवर लावले जातात जेणेकरून त्या कर्मचारी यांना आराम करून त्यांचे अवैध धंदे करता यावे. व आपल्यालाही (ड्युटी लावणारे यांना) त्यांच्याकडून पैसे मिळावे. तसेच अवैध धंद्यातून पैसे मिळवण्यासाठी / ऐश आराम करण्यासाठी बरेच कर्मचारी पोलीस स्टेशनला जाण्याऐवजी पोलीस मुख्यालय निवडतात अथवा पोलीस मुख्यालय सोडत नाही.
यामुळे जे पोलीस कर्मचारी पैसे न देता प्रामाणिकपणे ड्युटी करतात त्यांना वारंवार ड्युटी लावली जाते व अशामुळे त्यांच्यावर अन्याय केला जातो.
तसेच ज्या प्रामाणिक पोलीस कर्मचारी यांना पोलीस खात्यातून न्याय मिळत नाही ते खात्यांतर्गत खोटी कारवाई किंवा टार्गेट होण्याच्या भीतीपोटी समोर येवून वरिष्ठ अधिकारी यांचेकडे तक्रार करत नाहीत असे कर्मचारी माझेकडे तोंडी तक्रार करतात. किंवा माझे नावाने (दीपककुमार पी. गुप्ता) तक्रारी अर्ज करून माझे व वरिष्ठ पोलीस अधिकारीचे भ्रष्टाचारकडे लक्ष वेधत आहे. अशी एक मी न केलेली परंतु माझ्या नावाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पोलीस कर्मचारी ललित मोतीराम पाटील याचे विरुद्ध मा.पोलीस अधीक्षक जळगाव तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक जळगाव व मा.आर.पी.आय. मुख्यालय जळगाव यांना उद्देशून दिनांक २९ मार्च २०२३ रोजी केलेली तक्रार यासोबत जोडत आहे. त्या तक्रारीवर माझे असे म्हणणे आहे कि, ती तक्रार मी केलेली नाही परंतु त्यावर प्रामाणिकपणे चौकशी होवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
वरील सर्व बाबीचे अवलोकन केले असताना माझे मनात प्रामाणिक प्रश्न निर्माण झाले आहे कि, जे पोलीस खाते आपले कर्मचारी यांना न्याय देवू शकत नाही ते नागरिकांचे तक्रारींना न्याय कसा देणार ?
तरी पोलीस खात्यातील प्रामाणिक कर्मचारी यांना न्याय देने करिता माझी आपल्याला विनंती आहे कि,
१) हजेरीवर जास्तीत जास्त कर्मचारी हजर असावे व BIOMATRIK THUMP पद्धत अमलात आणावी.
२) जळगाव पोलीस मुख्यालयातील तसेच राज्यातील सर्व पोलीस मुख्यालयातील स्टेशन डायरी CCTNS प्रणालीत सुरु करून पोलीस मुख्यालयातील स्टेशन डायरी ONLINE करावी.
३) जळगाव पोलीस मुख्यालयातील ज्या रजिस्टरमध्ये ड्युटी लावली जाते त्याची फोटो कॉपी त्याचवेळी (ड्युटी वाटप नंतर लगेचच) पोलीस मुख्यालयचे whatsup ग्रुपवर टाकून त्याची एक सत्यापित प्रत जळगाव पोलीस मुख्यालय येथील दर्शनी भागावर नियमित व वेळेवर लावण्यात यावी याबाबत संबंधिताना आदेश व्हावे.
४) जळगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी यांना रजेवर सोडताना विनाकारण अडवणूक करू नये. याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकारीना आदेश व्हावे.
५) जळगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी यांना नियमित ड्युटी लावताना पैसे न घेता त्यांना प्रवासासाठी सोयीस्कर पडेल अशी ड्युटी लावावी. याबाबत संबंधिताना आदेश व्हावे.
६) पैश्याच्या आमिषापोटी गरज नसताना जिथे अतिरिक्त पोलीस कर्मचारी ड्युटीसाठी दिले जातात तसेच वर्षानुवर्ष एकाच ड्युटीवर चिटकून बसलेले आहेत. त्यांना तात्काळ बदलून इतर नियमित वेगवेगळ्या ड्यूटीसाठी वापरण्यात यावे. याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकारीना आदेश व्हावे.
७) दररोज ड्युटी लावताना कोणत्याही आमिषापोटी किंवा टार्गेट करून ड्युटी न लावता व भेदभाव न करता ड्युटी वाटप कराव्यात. याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकारीना आदेश व्हावे. ही नम्र विनंती.
The bulletin board’s user-friendly interface and straightforward registration process make it easy for newcomers to get started.