खंडणीचा गुन्हा असलेल्या नियंत्रण कक्षातील निलेश माईंनकर ची रत्नागिरीला रवानगी….!
लाल दिवा, ता. २३ : राज्यातील १४३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस उपअधिक्षक या पदावर पदोन्नती देण्याचे आदेश गृह विभागाचे अव्वर सचिव सप्नील बोरसे यांनी रात्री उशिरा काढले..
पदोन्नती मिळालेल्यांमध्ये नाशिक मधील डॉ. सीताराम कोल्हे, आनंदा वाघ, दत्ता पवार आदींचा यामध्ये समावेश आहे. सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना पदोन्नतीने सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट 2 चें वपोनि आनंदा वाघ यांना पोलीस उपअधिक्षक श्रीरामपूर येथे पदोन्नती देण्यात आली. भद्रकाली पोलीस ठाण्याचे बांबळे यांची पोलीस उपअधिक्षक धाराशिव येथे नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांना शहादा जि. नंदूरबार येथे पदोन्नती देण्यात आली. विशेष शाखेचे संजय बाबले
सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वपोनि साजन सोनवणे यांची अक्कलकुवा जि. नंदुरबार येथे पोलीस उपअधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पोलीस अकॅडमी येथील हेमंत सोमवंशी यांची अप्पर पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेशन विभाग नाशिक येथे पदोन्नती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाचे निलेश माईनकर यांची रत्नागिरी येथे पोलीस उपअधिक्षक मुख्यालय येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीनंतर नाशिक आयुक्तालय व नाशिक ग्रामीण येथे पुढील अधिकाऱ्यांना पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली आहे. नितीनकुमार ओकावे यांची नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधिक्षक मुख्यालय येथे नियुक्ती झाली. किरण साळवे यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे उपअधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.