त्र्यंबक घटनेबाबत राजसाहेबांचे वक्तव्य एकांगी : गजु भाऊ घोडके दुसरी बाजूही समजावून घेण्याची पत्रकात विनंती..!
लाल दिवा-सिडको, ता. २१ : त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या घटनेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले विधान एकांगी असून त्यांना सकल हिंदू समाजातर्फे दुसरी बाजू आम्ही समजावून सांगू,असे प्रतिपादन कट्टर हिंदूत्ववादी नेते गजू घोडके यांनी केले.
त्र्यंबकेश्वर मंदिराला धूप दाखवण्याची परंपरा पूर्वापार चालत आली असेल तर इतरांनी त्याचे राजकारण करू नये आणि ही प्रथा सुरू ठेवावी.तसेच याबाबतचा निर्णय गावकऱ्यांनी घ्यावा असे सुतोवाच राज ठाकरे यांनी केले आहे. परंतु या प्रकरणाबाबत त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे.फक्त एकच बाजू त्यांच्यासमोर मांडण्यात आली आणि त्यावरूनच राज साहेबांनी माध्यमांशी बोलताना वरीलप्रमाणे वक्तव्य केले असावे असे आम्हाला वाटते.परंतु ही पूर्वापार परंपरा नाही असे विश्वस्तांनीच स्पष्ट केले आहे.त्यामुळे याला नक्कीच राजकीय वास येतो.धूप दाखवण्याच्या नावाखाली मंदिरात चादर चढविण्याचा आणि हेतूता दोन समाजांमध्ये कटूता व तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता हे आता लपून राहिलेले नाही.कट्टर हिंदुत्ववाद्यांनी या घटनेनंतर गोमूत्र शिंपून या परिसराचे शुद्धीकरण केले आणि ते योग्यच झाले.कुणी आमच्या प्रार्थना मंदिरात येऊन शांतता बिघडविणारे कार्य करीत असेल तर आम्ही ते खपवून घ्यायचे का? आम्ही त्याला अटकाव करायचा नाही का? हे जर असेच चालू ठेवले तर आमची धार्मिक स्थळे सुरक्षित राहतील का? हा खरा सवाल आहे. आमची राज साहेबांना एकच विनंती आहे की आपण एक बाजू समजून घेतली आणि त्यावरून आपण आपले मत मांडले.आता दुसरी बाजू ही समजावून घ्या आणि त्यानंतर आपण जे काही सांगाल ते आम्हाला मान्य राहील.आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही लवकरच मुंबई येथे जाऊन राजसाहेबांची भेट घेणार असल्याचेही गजू घोडके यांनी नमूद केले