पुणे येथील वरिष्ठ पो.निरीक्षक स्वप्नाली शिंदे व सहाय्यक पो.नीरिक्षक मदन कांबळे याच्यावर आ. नितेश राणे आणणार हक्कभंग….. ? यांची लवकरच होणार आर्थिक चौकशी….? केंद्रीय आयोगाकडून होणार चौकशी….?
लाल दिवा : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे त्याची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे या प्रकरणामुळे राजकीय सामाजिक व धार्मिक वातावरण चांगलेच तापले असून घरात घुसून मुलीला बलात्काराची धमकी देणारा समाजकंटक नराधमांना पाठीशी घालणाऱ्या तेथील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्ष स्वप्नाली शिंदे यांच्यावर हक्क भंग आणण्याचा निर्णय आमदार नितेश राणे यांनी घेतला असून लवकरच त्यांच्यावर हक्कभंग करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
पुणे येथील मार्केटयार्ड मधील गल्ली नं 15 मध्ये नामे राहुल कांबळे यांच्या बहिणीला नामे शुभांगी कांबळे ह्या दलीत कुटुंबाला हर्षद बागवान, सोहेल बागवान आणि असिफ बागवान यांनी छेडछाड केली. रमजान निमित्त कोणतेही ट्रस्ट नसलेल्या व कोणतेही पावती पुस्तकं नसताना आणि घराघरात वर्गणी गोळा करण्याचे काम बेकायदेशररित्या काही समाजकंटक करत होते. एका घराच्या बाहेर एक दलित समाजाची मुलगी भांडी घासत होती त्या मुलीकडे सदर आरोपींनी पैशाची मागणी केली त्यावेळी त्या मुलीने सांगितले की माझे आई-वडील घरी नाहीयेत ते आल्यावर तुम्ही या. त्यावेळी वरील आरोपींनी मुलीकडे ती एकटी पाहून पैशाची मागणी केली व पुढे म्हणाले की वर्गणीचे पैसे नसले तरी चालतील तू आहेस की. आणि तिच्याशी छेडछाड सुरू केली. त्यात राहुल कांबळे मुलीचा अल्पवयीन भाऊ तिला वाचवायला आला. राहुल याला हर्षद बागवान, सोहेल बागवान, असिफ बागवान, सलमान शेख, समीर बागवान यांनी गल्ली नं 15 मधून बाहेर ओढत आणले आणि भर रस्त्यावर, मारहाण करायला सुरुवात केली. राहुल कांबळे त्यातून सुटला तर खर पण त्यानंतर पुन्हा हर्षद बागवान, सोहेल बागवान, असिफ बागवान, सलमान शेख, समीर बागवान आणि त्यांच्यासोबत इतर १५ ते २० पोरांना घेऊन आले आणि राहुल कांबळे आणि शुभांगी कांबळे यांना जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली.
या वरील विषयात पीडित महिलेला कायदेशीर मदत करण्यासाठी 'दर्द से हमदर्द तक' या सेवाभावी संस्थेचे दोन वकील हे मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते. तेव्हा पीआय स्वप्नाली शिंदे त्याचा सहकारी अधिरी एपीआय मदन कांबळे दारूच्या नशीत होते त्यांनी उपस्थित वकिलांना मारहाण केली व गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. व्हिडीओ रेकॉर्ड झालं हे लक्षात येताच पीआय यांनी "तुम्ही आरोपींना शस्त्र पुरवत आहात असा गुन्हा दाखल करेल." अशी धमकी देऊ लागले.
त्यानंतर सीनियर पी आय स्वप्नाली शिंदे या पोलीस स्टेशनमध्ये आल्या आणि त्या म्हणाल्या की, "पोलीस स्टेशनमध्ये वकिलांचा काय संबंध इथे फक्त आमचा आवाज चालणार" सिनियर पोलीस इन्स्पेक्टर स्वप्नाली शिंदे यांनी API मदन कांबळे यांच्या सांगण्यावरून आदेश देत वकील स्वप्नील महाजन व विकास जाधव यांना बेकायदेशीर रित्या ताब्यात घेतले. या सर्व विषयांतर पीडित महिलेने व काही तरुणांनी आमदार नितेश राणे यांना रात्री १ वाजता संपर्क केला आणि स्वप्नाली शिंदे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतले नाही उलट चुकीचा भाषेचा शब्द प्रयोग करण्यात आला. त्यानंतर डीसीपी यांना फोन केला आसता त्यांनी देखील कोणाचे फोन घेतले नाही मात्र पुणे आयुक्त यांनी तात्काळ फोन घेऊन विषय मार्गी लावला आणि वकिलांना सुखरूप सोडण्यात आले. तसेच पुणे BJP शहर अध्यक्ष यांनी पोलिस स्टेशन गाठले आणि प्रकरणात मध्यस्थी केली. या संदर्भात पीआय यांनी कोणतीही तक्रार घेतली नसून स्वप्नीली शिंदे यांची आर्थिक चौकशी लागणार आहे. त्यांची आर्थिक मालमत्ता भरपूर आहे का? हे देखील तपासले जाणार आहे तसेच बालहक्क आयोगात तक्रार करण्यात आलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार त्यांना लवकरच नोटीस मिळणार असल्याचे समजते आहे. आणि येत्या अधिवेशनात त्यांच्यावर आमदार नितेश राणे हक्कभंग देखील आणणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या संपूर्ण प्रकरणात व्हिडिओ व्हायरल झाले असून वकील संघटना या मध्ये आंदोलन करण्याची शक्यता आहे तसेच पीआय स्वप्नाली शिंदे यांना पोलिस विभागातून बरखास्त करावे अशी देखील मागणी सकल हिंदू समाज येत्या काही दिवसात करणार आहे. येणारा काळच सांगेल त्यांच्यावर काय कारवाही होते हे बग्याचे ठरेल.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1