ज्ञानपीठ विजेते साहित्यिक मावजो यांच्या हस्ते डॉ. शहाणे बंधूंच्या पुस्तकाचे प्रकाशन..!

विशेष प्रतिनिधी, विक्रांत डहाळे

लाल दिवा, ता. २१ : एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबईयांच्यासाठी डॉ. राजेंद्र आणि डॉ. कृष्णा या शहाणे बंधूंनी तृतीय वर्ष कला या वर्गासाठी लिहिलेल्या “इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट” या इंग्रजी माध्यमातील पुस्तकाचे प्रकाशन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.

अर्थशास्त्र अधिकाधिक विद्यार्थी भिमुख करावे असे प्रतिपादन साहित्यिक मावजो यांनी यावेळी केले. डॉक्टर शहाणे बंधूंनी लिहिलेल्या नवव्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते, ते पुढे म्हणाले की, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट हा विषय महत्त्वाचा आहे यासाठी विद्यार्थ्यांनी याचा मन लावून अभ्यास करावा.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, अन्न व औषध प्रशासन, नाशिक…सहायक आयुक्त (अन्न) मनीष सानप, अविनाश वाळुंजे, सुनील गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पुस्तक लिखाणाची पार्श्वभूमी डॉ. कृष्णा शहाणे यांनी विशद केली, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांचा सत्कार डॉ. कृष्णा शहाणे यांच्या हस्ते करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अविनाश वाळूंजे यांनी केले तर डॉ. योगिता देवळालीकर यांनी आभार मानले.

कार्यक्रमास बिटको महाविद्यालय नाशिक रोड येथील प्रोफेसर तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कृष्णा शहाणे, डॉ. राजेन्द्र शहाणे, सौ.विद्या शहाणे, डॉ. ज्योत्स्ना मईड, डॉ. सौ. जयश्री शहाणे, प्रीती शहाणे, पार्थ शहाणे, सार्थक शहाणे, श्रद्धा मईड आदींसह शहाणे परिवारातील सदस्य व आप्तेष्ट उपस्थित होते.

 

 

फोटो ओळी 

एस.एन.डी. टी. वुमन्स युनिव्हर्सिटी मुंबई, यांच्या तृतीय वर्ष कला या वर्गासाठी डॉ.राजेंद्र शहाणे आणि डॉ. कृष्णा शहाणे यांनी लिहिलेल्या “इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट” या इंग्रजी माध्यमातील पुस्तकाचे प्रकाशन करताना प्रसिद्ध ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो, समवेत माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, डॉ. कृष्णा शहाणे, अविनाश वाळुंजे, सुनील गायकवाड आदी.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!