महसूल सप्ताहा अंतर्गत “एक हात मदतीचा ” विविध योजनां संपन्न – प्रिती अग्रवाल, मंडळ अधिकारी वरखेडा..!
दिंडोरी,ता. 4 : राज्यात मंगळवारी दि 01 ऑगस्ट 2023 पासून सुरु झालेल्या महसूल सप्ताहा अंतर्गत बुधवार दि 02 ऑगस्ट रोजी प्रिती अग्रवाल, मंडळ अधिकारी वरखेडा तालुका दिंडोरी यांचे मार्फत बोपेगाव येथे एक हात मदतीचा ” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
सदर कार्यक्रमात बोपेगाव येथे सर्व महसूल अधिकारी कर्मचारी यांचे मार्फत शिवारफेरी काढण्यात आली. शिवारफेरी मध्ये मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, पोलिस पाटील, गावातील ज्येष्ठ नागरीक यांचा समावेश होता. शिवारफेरी दरम्यान विशेष सहाय्य योजनेकरीता पात्र परंतु वंचित असलेल्या दिव्यांग निराधार लाभार्थी यांची शोधमोहीम घेण्यात आली व गरजवंत यांना संजय गांधी योजना, वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी योजना या योजनांची माहिती देऊन अर्ज वाटप करणेत आले.
तसेच घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये Pubilc data entry करून फेरफार अर्ज दाखल करणेबाबत मार्गदर्शन करणेत आले. अर्ज भरण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवन्यात आले. तसेच इ पीक पाहणी बाबत जन जागृती करणेत आली.
सदरच्या कार्यक्रमास तलाठी बोपेगाव गजकुमार पाटील, तलाठी राजापूर अजय भोये,तलाठी वरखेडा कांडेकर उपस्थित होते.. कार्यक्रमास दिंडोरी तहसिलदार पंकज पवार यांचे मार्गदर्शन लाभले.