शिवाजी चुंबळेंसह परिवारातील सदस्य भाजपाच्या वाटेवर…… उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये होणार मुंबईत जाहीर प्रवेश सोहळा….!
लाल दिवा-नाशिक,ता.१ : – कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे, ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका कल्पना चुंबळे, युवा सेनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी व गौळाणेचे सरपंच अजिंक्य चुंबळेसह शहर व जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समजते.
गेल्या दोन वर्षांपासून ठाकरे गटापासून लांब राहणारे चुंबळे परिवार आता भाजपच्या वाटेवर असल्याचे खात्रीलायक वृत्त दैनिक सकाळला प्राप्त झाले आहे. या वृत्तानुसार येत्या आठ दिवसांमध्ये चुंबळे परिवार व त्यांचे समर्थक मुंबईत भाजपा कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. चुंबळे परिवाराच्या प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. शिवाजी चुंबळे यांचे फार मोठे प्रस्थ शहर व जिल्ह्यात आहे. पुर्वी चुंबळे परिवार मंत्री छगन भुजबळ याचे निकटवर्ती मानले जात होते . कालांतराने त्यांच्यामध्ये दुही निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचा मार्ग अवलंबला. परंतु शिवसेनेची सत्ता असताना चुंबळे परिवाराला कुठल्याही प्रकारची पाहिजे तशी मदत झाली नाही. विशेष करून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांच्यावर फार मोठा अन्याय झाल्याचे ते वेळोवेळी बोलताना दिसून येतात. पक्ष संकट काळात कामात येत नसेल तर अशा पक्षात राहुन काय करायचं असही ते बोलतांना दिसतात. तसेच त्यांना थांबवण्यासाठी ही फारसे कोणी प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे सरते शेवटी तब्बल दोन वर्षाच्या कालावधीनंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे ठरविले आहे. सिडको सारख्या परिसरामध्ये ठाकरे गटाचे फार मोठे वलय आहे. असे असताना या ठाकरे गटाचा एक शिलेदार भाजपच्या वाटेवर जात असल्याने सिडकोत ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात फार मोठे भगदाड पडणार आहे. भविष्यात ही पोकळी कशी भरणार असा प्रश्न आता सर्वसामान्य शिवसैनिकांना या निमित्ताने निर्माण होऊ लागला आहे. चुंबळे यांना भाजपा त नेमके कोणते पद मिळणार किंवा बक्षीस मिळणार याबाबत अद्यापपर्यंत कुठलाही खुलासा झालेला नाही. परंतु भाजप प्रवेशामागे कृषी उत्पन्न बाजार समितीतील विरोधकांचा वचपा काढणारा अशी देखील चर्चा या निमित्ताने ऐकायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे व त्यांच्या समूहाला पुन्हा एकदा शिवाजी चुंबळे चेक मेट देणार असल्याचे बोलले जात आहे.
याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र महाले हे देखील लवकर भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
- *
हे करणार प्रवेश*
- शिवाजी आप्पा चुंभळे
सलग 3 वेळा नगरसेवक नाशिक महानगरपालिका, स्थायी समिती सभापती नाशिक महानगरपालिका, मा. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक व विद्यमान संचालक*
नाशिक जिल्हा बँक विद्यमान संचालक
- सौ. कल्पना शिवाजीराव चुंबळे
विद्यमान नगरसेविका व सलग दोन वेळा नगरसेविका नाशिक महानगरपालिका
चेअरमन : विल्होळी विविध कार्यकारी सोसायटी
- सौं विजयश्री रत्नाकर चुंबळे
मा. जिल्हा परिषद अध्यक्ष नाशिक
- रत्नाकर केरू पाटील चुंबळे
माजी पंचायत समिती सभापती नाशिक
विद्यमान संचालक कांदा बटाटा संघ नाशिक जिल्हा बिनविरोध
- श्री वामन पांडुरंग चुभळे
विद्यमान संचालक तालुका शेतकी संघ नाशिक
- बाजीराव पांडुरंग चुंबळे
विद्यामंद चेअरमन गौळणे विविध कार्यकारी सोसायटी
- श्री अर्जुन केरू पाटील चुंबळे
विद्यमान संचालक मजूर फेडरेशन नाशिक जिल्हा
- अजिंक्य आण्णा शिवाजीराव चुंबळे
श्रीमंत सरपंच गौळणे व युवा नेते नाशिक