सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सत्कार…!
लाल दिवा-नाशिक महानगरपालिकेतील विविध संवर्गातील व विभागातील अधिकारी व कर्मचारी हे नियत वयोमानाने माहे ऑगस्ट २०२४ मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा दिनांक ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन येथे पार पडला.
नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. नितीन नेर यांच्या शुभहस्ते खालील कर्मचाऱ्यांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि वृक्षरोप देऊन सेवापूर्ती सत्कार करण्यात आला:
- विजय बाबुराव बागुल
- कैलास कारभारी पांगारकर
- श्रीमती गडाख ज्योती शांताराम
- बाबुराव मुरलीधर काठे
- दत्तू शंकर गोतरणे
- किशोर चुनीलाल जेधे
- श्रीमती लक्ष्मी शर्मा चव्हाण
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवापूर्ती निरोप देण्यासाठी मनपाचे समाजकल्याण विभागाचे उपायुक्त श्री. नितीन नेर, जनसंपर्क अधिकारी श्री. योगेश कमोद, श्री. नितीन बागुल, श्री. आनंद भालेराव, श्री. इफतिकार शेख, श्री. मयुर चारोस्कर, श्री. सागर तळपदे, श्री. रमेश पागे आदींसह मनपा अधिकारी कर्मचारी व सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.