म्हसरूळ सोनसाखळी चोरी प्रकरणी पोलिसांचा तत्पर तपास सुरू, लवकरच यश मिळण्याची शक्यता

म्हसरूळमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरी

लाल दिवा-नाशिक, म्हसरूळ – ६ सप्टेंबर २०२४: म्हसरूळ येथे आज दुपारी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना श्री गणेश रो-हाउस समोर, रामचंद्र नगर, नायरा पेट्रोल पंपाच्या मागे, दिडोरी रोड, म्हसरूळ येथे दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली. 

फिर्यादी सौ. मायावती दत्तात्रय शिंदे या साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन करून घरी परतत असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने हिसकावून तोडली आणि पळून गेला. 

घटनेची माहिती मिळताच सौ. शिंदे यांनी तात्काळ म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक क्षिरसागर आणि पोलीस हवालदार वसावे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात केली आहे. दुचाकीवरील दोघांना पकडण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

चोरीला गेलेल्या सोनसाखळीची किंमत २,५०,०००/- रुपये असून त्यामध्ये २६ ग्रॅम वजनाची एक मोठी सोनसाखळी आणि १२ ग्रॅम वजनाची एक छोटी सोनसाखळी आहेत. दोन्ही साखळ्यांवर अंबेकर ज्वेलर्सचे होलमार्क आहे.

या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या घटनेसंदर्भात कुणालाही काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ म्हसरूळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!