पोलीस आयुक्तांचा पायगुण ठरला लकी : राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत पोलीस खेळाडुंनी केले रौप्य व कांस्य पदक संपादन ….!

लाल दिवा-नाशिक,ता.२९ : महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्यात असलेली खेळाडू वृत्ती टिकुन राहावी तसेच पोलीसदलात काम करतांना चांगली प्रेरणा मिळावी व स्पर्धेचे व्यासपीठ मिळावे म्हणुन पोलीस किडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

दि.१९ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत शिवछत्रपती किडा सकुंल, बालेवाडी पुणे येथे राज्यस्तरीय नेमबाज स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील ६५ खेळांडुनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये नाशिक शहर कडील सपोनि. महेश हिरे व पोलीस शिपाई चंद्रशेखर भावसार हे सहभागी झाले होते.

पोलीस नेमबाजी स्पर्धेत २५ मिटर फायर आर्म व सर्विस वेपन २०० मिटर रायफल फायर या किडा प्रकारात सपोनि. महेश हिरे यांनी २ कांस्य व पोअं/चंद्रशेखर भावसार यांनी १ रौप्य पदक प्राप्त करून संपूर्ण महाराष्ट्रात नाशिक शहर पोलीस दलाचे नाव उज्ज्वल केले.

सपोनि. महेश हिरे यांनी राज्य पोलीस नेमबाजी स्पर्धेत आज पावेतो सुवर्ण, रौप्य व कांस्य असे एकुण १७ मेडल व पोअं/चंद्रशेखर भावसार यांनी ५ मेडल संपादन केले आहेत. यानंतर होणा-या अखिल भारतीय शुटींग स्पर्धेकरीता नाशिक शहर कडील दोन्ही खेळाडु दिल्ली व राजस्थान येथे सहभागी होणार आहेत.

सपोनि. महेश हिरे व पोअं/चंद्रशेखर भावसार या दोन्ही खेळांडुनी पोलीस मुख्यालय नाशिक शहर येथील अत्याधुनिक शहिद हेमंत करकरे शुटींग रेंज येथे सराव करून यश संपादन केले आहे. या दोन्ही विजयी खेळाडुंना पोलीस आयुक्तालय नाशिक शहर कडील किडा प्रमुख सपोउनि. अश्पाक शेख यांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.

नाशिक शहरकडील खेळाडुंनी राज्यस्तरीय पोलीस नेमबाजी स्पर्धेत यश संपादन केल्याने मा. श्री. संदिप कर्णीक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर व मा. श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), नाशिक शहर यांनी पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला. तसेच अखिल भारतीय शुटींग स्पर्धेकरीता निवड झाल्याने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच मा. श्री. संदिप कर्णीक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस मुख्यालय येथे सर्व खेळाडूंची भेट घेवुन त्यांच्या अडी-अडचणी समजुन घेवुन आयुक्तालयातील १५० पुरुष व महिला खेळाडूंना अत्याधुनिक किडा साहित्य, खेळाडुंना डायट व प्रोटीन्स उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे पाच वर्षापासुन पोलीस मुख्यालय येथे अर्धवट असलेले बास्केट बॉल मैदानाचे काम तातडीने सुरू करून नवीन सिंथेटीक बॉस्केट बॉल मैदानाचे बांधकाम सुरू केले आहे. मा. पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी खेळाडुंना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे खेळाडूंमध्ये प्रोत्साहन मिळाल्याने नाशिक येथे होणा-या ३४ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस किडा स्पर्धेमध्ये नाशिक शहर कडील खेळाडु जास्तीत जास्त पदक प्राप्त करून यश संपादन करतील.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!