शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पोलीस आयुक्त कर्णिक यांचा कालिका मातेच्या मंदिरात हजेरी

भाविकांच्या सुरक्षेसाठी सज्ज नाशिक पोलीस

लाल दिवा-नाशिक,दि.3 (प्रतिनिधी) – शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली असून या पावन प्रसंगी नाशिक शहर पोलिसांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. “शारदीय नवरात्री नाशिककरांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो, हीच सदिच्छा,” असे पोलीस दलाने म्हटले आहे.

नवरात्रीत शहरातील विविध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळते. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पोलीस दलाकडून सर्वतोपरी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

           नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक (भा. पो. से.) यांनी आज सकाळी श्री कालिका माता मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच, त्यांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या बंदोबस्ताचा आढावा घेतला.

यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!