पोलिस आयुक्त कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉट्सऍप सेवेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद… अवैध धंद्यांवाल्यांचे धाबे दणाणले…!
लाल दिवा-नाशिक,ता.२९ : नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात नागरिकस्नेही पोलिसिंगवर भर देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. शिवाय, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना शहरातील कारवाई, घडामोडींची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांकडून अभिप्राय, सूचना मागवण्यासाठी शहर पोलिसांनी 99 233 233 11 हा WhatsApp क्रमांक सुरू केला आहे.
नाशिकमधील नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून, दिड दिवसात पोलिस आयुक्त WhatsApp क्रमांक 99 233 233 11 यावर 266 संदेश प्राप्त झाले आहेत. यावरूनच नाशिकमधील नागिरकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
Look at this post on Facebook
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02rcdwQ7B3ouGiYbyrx1WheLr1E4MmpV1VkbBvfgsgepSQW9f1MGymFFU8avfeLpFql&id=100069362311166&mibextid=ZbWKwL
संदीप कर्णिक यांनी नाशिक पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून नागरिककेंद्रित पोलिसिंगवर भर दिला आहे…. त्यानुसार नाशिक पोलिसांच्या ‘X हँडल’वर नागरिकांनी केलेल्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद दिला जात आहे. नाशिक शहर पोलिसांच्या कारवाईची माहितीही सांगितली जात असल्याने नागरिकांना पोलिसांच्या कार्यप्रणालीची माहिती मिळत आहे. शहर पोलिसांच्या X हँडलवर 49 हजार फॉलोअर्स आहेत. मात्र, अनेक नागरिक ‘X’ वापरत नसल्याने त्यांच्या सुविधेकरिता WhatsApp माध्यमातून तक्रार नोंदवून त्यावर कारवाईचे अपडेट मिळविण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
https://twitter.com/nashikpolice/status/1740604383883051256?t=dHW8wdnQTay2rDxXjesIKg&s=19
पोलिसांच्या WhatsApp क्रमांकावर केवळ सूचना व अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. त्यानुसार सूचना, अभिप्राय WhatsApp क्रमांकावर नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात वाहतुकीसंदर्भातील समस्या, तक्रारी व सूचना अधिक होत्या. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक स्वतः लक्ष घालून नागरिकांच्या समस्यांचे निरसन करत असल्यामुळे नागरिक आभार व्यक्त करत आहेत……..!